आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Attacked ISIS Terrorist Jihadi John By Airstrike

शीर कापणारा ISIS चा दहशतवादी जेहादी जॉनवर हवाई हल्ला, मारल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ISIS चा दहशतवादी जेहादी जॉन. - Divya Marathi
ISIS चा दहशतवादी जेहादी जॉन.
रक्का (सिरिया) - इस्लामिक स्टेटचा ब्रिटिश दहशतवादी जेहादी जॉनवर अमेरिकेने हवाई हल्ला केला आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या या हल्ल्यात तो मारला गेला असल्याचा दावाही काही अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र पेंटॉगॉनने अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. त्याच्यावर हल्ला केल्याच्या वृत्ताला मात्र दुजोरा मिळाला आहे. जेहादी जॉन ISIS च्या अनेक व्हिडिओंमध्ये बंधकांचे शीर कापताना दिसला आहे.

कुठे झाला हल्ला...
मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या मिलिट्रीने गुरुवारी सिरियाच्या रक्का शहरामध्ये ड्रोनद्वारे जेहादी जॉनच्या गाडीवर हल्ला केला. याबाबत पेंटॉगॉनचे प्रेस सेक्रेटरी पीटर कूक यांनी स्टेटमेंट जारी केले. गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यातून काय यश मिळाले याची माहिती गेतली जात आहे. जेहादी जॉनच्या मृत्यूसंदर्भात पुरेसी माहिती मिळाल्यानंतर ती दिली जाईल, असे यात म्हटले आहे.

जेहादी जॉन...
> जेहादी जॉनची हा 27 वर्षीय मोहम्मद अमवाजी असल्याचे समोर आले आहे. तो इंग्लंडचा राहणारा मूळचा कुवेतचा आहे. कॉम्प्युटर सायन्सचा ग्रॅज्युएट आहे.
> ब्रिटिश लेहज्यामुळे फेब्रुवारी महिन्यात त्याची ओळख सार्वजनिक झाली होती. 2013 मध्ये ISIS मध्ये सहभागील होण्यासाठी तो सिरियाला आला होता. दोन अमेरिकन पत्रकार जेम्स फोले (40) आणि स्टीव्हन सोटलॉफ (31) यांच्यासह दोन ब्रिटिश नागरिक डेव्हीड हँस (44) आणि अॅलन हेनिंग (47) तसेच इतर चार बंधकांचे शीर त्याने कापले होते.
> 2014 पासून आतापर्यंत इस्लामिक स्टेटच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सात व्हिडिओंमध्ये तो दिसून आला आहे. सर्वात आधी ऑगस्ट 2014 मध्ये त्याने अमेरिकेचा पत्रकार जेम्स फोलेचे शीर कलम केल्याचा व्हिडीओ जारी केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पेंटागॉनच्या प्रेस सेक्रेटरीने जारी केलेले स्टेटमेंट...