आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Based Bangladeshi Blogger Killed In Dhaka By Some Religious Group

PHOTOS: बांगलादेशमध्ये अमेरिकी ब्लॉगरची निर्घृण हत्या, कट्टरतेला करायचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका (बांगलादेश)- धार्मिकतेवर ब्लॉगच्या माध्यमातून जोरदार प्रहार करणारे अमेरिकी ब्लॉगर अविजीत रॉय यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अविजीत मुळचे बांगलादेशमधील आहेत. ढाका विद्यापिठात आयोजित करण्यात आलेल्या बुक फेअरमधून परत येत असताना त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी रफिदा अहमद सोबत होती. हल्लेखोरांनी मांस कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या चाकूचा वापर करुन त्यांची हत्या केली.
बुक फेअरमधून घरी जात असताना काही लोकांनी अविजीत रॉय आणि पत्नी रफिदा अहदमवर जिवघेणा हल्ला केला. यात रफिदा गंभीर जखमी झाली. स्थानिक पोलिस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले, की हल्ला करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यातील दोघांनी अविजीत यांच्यावर वार केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नीही यात गंभीर जखमी झाली. त्यांचे एक बोटही कायमचे तुटले आहे.
घटनास्थळावरुन पोलिसांनी दोन चाकू ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. परंतु, स्थानिक एका मुस्लिम गटाची चौकशी करण्यात येत आहे. या गटाने हा हत्येची प्रशंसा केली आहे.
मुक्तो मनो (फ्री माइंड) या ब्लॉगवर धर्मनिरपेक्ष विचारांवर लेख लिहिल्यावर अविजीत यांना धमक्या मिळायच्या. अविजीत यांच्या हत्येनंतर हा ब्लॉग http://www.mukto-mona.com/ बंद करण्यात आला आहे. त्यात बांगला भाषेत लिहिण्यात आले आहे, की आम्ही शोकाकूल आहोत. पण खतम झालेलो नाही.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाची छायाचित्रे... त्यांची पत्नी मदतीची याचना करताना...