आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Continue Its Counter Terrorism Against ISIS Obama

अमेरिका ISIS विरुध्‍द कारवाया सुरु ठेवणार, गरज भासल्यास इतर देशांनाही मदत - ओबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका इस्लामिक स्टेटविरुध्‍द (आयएसआयएस) आपली कारवाई सुरु ठेवणार, असल्याचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. जर या दहशतवादी संघटनेविरुध्‍द कोणत्याही देशाला मदत हवे असेल तर अमेरिका मदत करेल, असे त्यांनी स्पष्‍ट केले.
ओबामा राष्‍ट्रीय सुरक्षा गटाला मार्गदर्शन करताना बोलत होते. आयएसआयएसच्या ठिकणांवरील हल्ले तीव्र करुन ती उडवा, असे त्यांनी सुरक्षा गटाला सांगितले. राष्‍ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ओबामा यांनी अमेरिकेची आयएसआयएसला खात्मा करण्‍याच्या मोहिमेबाबत चर्चा केली.
अमेरिका आयएसआयएसवरील हल्ले सुरु ठेवणार असून जर एखाद्या देशाला याबाबत मदत हवी असेल त्यांना मदत केली जाईल यावर ओबामा यांनी जोर दिला, असे व्हाइट हाऊसने सांगितले.