आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारी २०१६ पर्यंत नरेंद्र मोदींचे व्हिसा रेकॉर्ड द्या : अमेरिकन कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिसासंबंधी सर्व दस्तऐवज फेब्रुवारी २०१६ पर्यंत सादर करण्याचे आदेश एका अमेरिकी कोर्टाने तेथील परराष्ट्र खात्याला दिले आहेत. यात मोदींवरील अमेरिका प्रवेशबंदी उठवण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयाच्या रेकॉर्डचाही समावेश आहे. सिख्स फॉर जस्टिस संस्थेच्या तक्रारीवरून कोर्टाने हा आदेश दिला. सदर्न डिस्ट्रिक्ट आॅफ न्यूयॉर्कचे जज जॉन जी. कोएल्टी यांनी ९ डिसेंबरच्या निकालात हे रेकॉर्ड मागवले.