आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us Drone Strike In Afganistan Kills Five Suspected Militants

'तहरिक-ए-तालिबान'चा म्होरक्या फजुल्लाह ड्रोन हल्ल्यात झाला ठार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- 'तहरिक-ए-तालिबान' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजुल्लाहचा अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियाने हे वृत्त दिले आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

फजुल्लाहच्या अफगाणिस्तानातील घरावर पाकिस्तानी लष्कर व अमेरिकेनेच्या आर्मीने केलेल्या ड्रोन हल्ल्यात फजुल्लाहसह त्याची पत्नी, मुलासह एकूण पाच जण ठार झाले आहेत.

'तहरिक-ए-तालिबान'ने गेल्या वर्षी पेशावरमधील लष्करी शाळा आणि मागच्याच आठवड्यात बाचा खान युनिव्हर्सिटीवर झालेल्या दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. दरम्यान, फजुल्लाहच्या मृत्यूच्या वावड्या यापूर्वीही अनेकवेळा उठल्या होत्य.