आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियावर बरसले होते लाखो बॉम्ब, हजारो गाव झाले बेचिराख...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र म्हणून कुप्रसिद्ध असलेला उत्तर कोरिया गेल्या काही वर्षांपासून अण्वस्त्र चाचण्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. या चाचण्या आणि हुकूमशहा किम जोंग उनकडून सततच्या धमक्यांमुळे अमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद पेटला आहे. 1950 मध्ये कोरियाच्या फाळणीच्या झालेले दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातील युद्ध प्रत्यक्षात आजही अमेरिका विरुद्ध रशिया असेच ओळखले जाते. यामध्ये अमेरिकेने दक्षिण कोरियाची तर, रशियाने उत्तर कोरियाची साथ दिली होती. जवळपास 3 वर्षे चाललेल्या या युद्धात दोन्ही देशांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्याची झळ आजही उत्तर कोरियाला पोहचत आहे. या युद्धात अमेरिकेने उत्तर कोरियावर तब्बल 6 लाख 35 हजार नापलाम बॉम्ब टाकले होते. या बॉम्ब वर्षावात हजारो गाव जळून खाक झाले. तसेच 30 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. 
 

रशिया, चीनकडून मिळत होती रसद
- छोटासा देश उत्तर कोरियाला सहज नष्ट करू असे युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेला वाटले होते. मात्र, अमेरिकेचा हा तर्क चुकीचा ठरला. 
- प्रत्यक्षात, उत्तर कोरियाला चीन आणि रशियाकडून खंबीर पाठिंबा होता. याच दोन देशांकडून उत्तर कोरियाला युद्धाचे साहित्य आणि दारुगोळ्याची रसद पाठवली जात होती. 
- त्यामुळेच, अमेरिकेला चीन आणि त्यावेळच्या सोव्हिएत संघ रशियाकडून उत्तर कोरियात जाणारी रसद थांबवणे अत्यावश्यक बनले होते. 
- याची संपूर्ण जबाबदारी दुसऱ्या महायुद्धातील नायक मानले जाणारे तत्कालीन जनरल डगलस मॅकअर्थर यांना देण्यात आली. यानंतरच युद्धाची दिशा बदलली.
 
 
हवाई दलाला दिले आदेश
- डगलस यांना माहिती होती, की मोठ्या संख्येने असलेल्या सैनिकांना पराभूत करणे कठिण आहे. त्यामुळे, त्यांची रसद थांबवण्यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाची विमाने थेट उत्तर कोरियाच्या लष्करी तळांवर पाठवण्यात आली. या तळांवर जबरदस्त बॉम्ब हल्ल्यांचे आदेशही देण्यात आले. 
- डलगस यांचा आदेश मिळताच अमेरिकेने डझनभर लढाऊ विमाने, बी-29 आणि बी-52 उत्तर कोरियाच्या असमंतात भिरकावले आणि शेकडो, हजारो, लाखो बॉम्बचा उत्तर कोरियावर अक्षरशः पाऊस पाडला. 
- या लढाऊ विमानांमध्ये नापलम बॉम्ब लावण्यात आले होते. हे बॉम्ब अतिशय ज्वलनशील अशा केमिकलने तयार केले जातात. जेणेकरून हे बॉम्ब जमीनीवर आदळताच आगीचा मोठा भडका उडतो. बॉम्बची संख्या हजारो-लाखोंमध्ये असल्याने कित्येक किलोमीटर सर्वत्र आगीचे लोंढे पसरले होते. 
- या बॉम्ब हल्ल्यांमध्ये अमेरिकेने केवळ चिनी आणि रशियन रसदच नव्हे, तर ज्या मार्गाने ही रसद पुरवली जात होती, ते देखील पूर्णपणे उद्ध्वस्त केले. 
- माध्यमांच्या आकडेवारीनुसार, यात नॉर्थ कोरियाच्या 5000 शाळा, 1000 रुगणालये, 6 लाख घरे उद्ध्वस्थ झाली होती. तसेच उत्तर कोरियाची 20 टक्के लोकसंख्या नष्ट झाली. 
- तेव्हापासूनच उत्तर कोरिया अमेरिकेचा शत्रू नंबर एक बनला आहे. दोघांच्या शत्रुत्वामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाची भिती व्यक्त केली जात आहे. 
 
 
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, त्या युद्धातील दुर्मिळ फोटोज...
बातम्या आणखी आहेत...