आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने पाक सीमेवर टाकला 10000 किलो वजनी बॉम्ब, इसिसचे 36 दहशतवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या हल्ल्यात एक अफगाणिस्तानी पोलीस सुद्धा जखमी झाला. त्यावर उपचार करताना वैद्यकीय कर्मचारी - Divya Marathi
अमेरिकेच्या हल्ल्यात एक अफगाणिस्तानी पोलीस सुद्धा जखमी झाला. त्यावर उपचार करताना वैद्यकीय कर्मचारी
जलालाबाद- अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेटच्या अड्ड्यांवर अमेरिकेने केलेल्या बाँबहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांची संख्या  ३६ वर पोहोचली आहे. 

अफगाणी अधिकारी म्हणाले, अमेरिकेने डागलेल्या जीबीयू-४३ बी (एमआेएबी) बाँबने अतिरेकी लपलेले अनेक बोगदे नष्ट झाले. पूर्वेकडील भागात हा हल्ला झाला होता. अमेरिकेने गुुरुवारी नंगरहार प्रांतात जगातील हा सर्वात मोठा बाँब टाकला होता. या बाँबला ‘मदर ऑफ ऑफ बॉम्स’  असे संबोधले जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ही मोहीम यशस्वी झाली असल्याचा दावा केला.
 
हल्ला पूर्णपणे यशस्वी - ट्रम्प
-  अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणावर 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची परवानगी मीच दिली होती असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. 
- हल्ल्याची मोहिम पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे सांगत त्यांनी आपल्या लष्करावर अभिमान असल्याचे सांगितले. तसेच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना याबद्दल शाबासकी दिली.
 
बॉम्बमध्ये ८१६४ किलो स्फोटके, दीड किमीचा परिसर बेचिराख
१० हजार किलो वजनी या जीबीयू-४३/बी बॉम्बमध्ये ८१६४ किलो स्फोटक होते. दीड किमी परिसरात या स्फोटाचा परिणाम झाला. हा जीपीएस गायडेड पहिला बॉम्ब आहे. याला मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट म्हणून ओळखले जाते. अमेरिकेने २००३ मध्ये तयार केलेला हा बॉम्ब प्रथमच वापरला आहे.
 
केरळचा एक जण ठार
इसिसचे तळ उद्ध्वस्थ करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली अण्वस्त्र विरहित बॉम्ब हल्ल्यात 7000 दहशतवाद्यांचा केरळच्या मुर्शीद देखील ठार झाला. केरळमधून बेपत्ता झालेले 21 युवक नंतर इसिसमध्ये समाविष्ट झाले. मुर्शीद त्यापैकीच एक होता. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...