आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP निकाल सांगतो, 2019 मध्येही मोदीच असणार पहिली पसंती- अमेरिकेच्या तज्ज्ञांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाची देशभरच नाही तर जगभर चर्चा होत आहे. पाच राज्यात भाजपला मिळालेले यश हे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदीच जनतेची पहिली पसंती राहातील हे दर्शवणारा हा निकाल असल्याचे अमेरिकेतील विश्लेषकांचे मत आहे. एवढेच नाही तर 2019 नंतरही मोदीच देशाचे नेतृत्व करतील असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजपला 325 जागांवर विजय मिळाला आहे. यामुळे भाजप 6 पटीने वाढला आहे. 
 
जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि परराष्ट्र व्यवहार विषयाचे असिस्टंट प्रोफेसर अॅडम जीगफेल्ड म्हणाले, 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून आगामी काळात फार मोठ्या बदलाचे संकेत नाहीत.'
- 'भाजप उमेदवारांच्या मतांची टक्केवारी सपा आणि बसपाच्या उमेदवारांपेक्षा फार जास्त आहे.'
- अमेरिकन इंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे रेसिडेंट फेलो सदानंद धुमे यांचे म्हणणे आहे, की या विजयाने भाजपच्या 2019 मधील विजयाचे संकेत दिले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मोदीच लोकप्रिय राहातील आणि जनतेची पसंती त्यांनाच मिळणार असे दिसत आहे. 
- जॉर्ज टाऊन विद्यापीठातली वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसचे प्रोफेसर इरफान नुरुद्दीन यांना वाटते की 2019 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही. त्यांना इतर पक्षांसोबत आघाडी करुन सरकार स्थापन करावे लागले. 
- प्रोफेसर नुरुद्दीन म्हणाले, 'भाजप राज्यांमध्ये अतिशय नियोजनबद्ध प्रचार करत आहे. त्यासोबतच निवडणुकीचे नियोजनही मायक्रो लेव्हलवर केले जात आहे. विरोधीपक्षाकडून तसे होताना दिसत नाही. एक मात्र आहे, की सर्व विरोधीपक्ष एकत्र आले तर भाजपला रोखता येईल.'.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...