आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींसोबत आमचे संबंध चांगले, डोकलाम वादावर भारत-चीनने चर्चेने तोडगा शोधावा- US

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - डोकलाम सीमेवर भारत-चीन आमने-सामने आले आहेत, यावर उभय देशांनी चर्चेतून मार्ग काढावा असे अमेरिकेने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आमचे चांगले संबंध असल्याचे सांगत अमेरिकेने डोकलाम सीमेवरील वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा होण्याची गरज व्यक्त केली आहे. 16 जूनपासून डोकलाम परिसरात वाद सुरु आहे. भारतीय सैन्य जोपर्यंत मागे हटत नाही तोपर्यंत चर्चा नाही, अशी अट चीनने घातली आहे. तर, भारताने दोन्ही देशांचे सैन्य मागे हटल्यानंतर चर्चेची तयारी दाखवली आहे. 
 
मीडिया रिपोर्टसनुसार, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते हीथर नुअर्ट यांनी शुक्रवारी म्हटले, 'डोकलाममधील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांसोबत आमचे चांगले संबंध आहे. त्यामुळे उभय देशांच्या सरकारांना चर्चेसाठी तयार करण्याचे काम आम्ही करत आहोत.'
- भारत-अमेरिका संबंधांवर हीथर म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आमचे चांगले संबंध आहे. जूनमध्ये ते अमेरिका दौऱ्यावर आले होते.'
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कुठे आणि काय आहे वाद... 
बातम्या आणखी आहेत...