आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणुचाचणी घेणा-या उत्तर कोरियाला US ने दाखवली ताकद, उडवले फाइटर विमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन B-1B बॉम्बर्सने दक्षिण कोरियाच्या  ओसान एयर बेसवरुन आकाशात झेप घेतली. - Divya Marathi
अमेरिकन B-1B बॉम्बर्सने दक्षिण कोरियाच्या ओसान एयर बेसवरुन आकाशात झेप घेतली.
ओसान एअर बेस (दक्षिण कोरिया) - उत्तर कोरियाच्या पाचव्या अणुबॉम्ब चाचणीच्या मुद्द्याने गंभीर रुप घेतले आहे. उत्तर कोरियाला ताकद दाखवण्‍याच्या उद्देशाने मंगळवारी अमेरिकेच्या बी-1बी बॉम्बर्सने दक्षिण कोरियाच्या आकाशात झेप घेतली. यामागे आपण दक्षिण कोरियाच्या पाठीमागे आहोत हे दाखवण्‍याचा प्रयत्न होता. या वेळी व्हाईट हाऊसनेही म्हटले, चीनसह पूर्ण आंतरराष्‍ट्रीय समुदाय उत्तर कोरियाच्या विरोधात एकत्र आला आहे. बराक ओबामांनी उत्तर कोरियाने नुकतेच घेतलेल्या अणुबॉम्ब चाचणीला जगासाठी धोका असल्याचे सांगितले आहे. गुआमकडे निघून गेले बॉम्बर्स...
-बी-1बी बॉम्बर्सला अमेरिका व दक्षिण कोरियन जेट्सने एस्कॉर्ट केले.
- वृत्तसंस्था एपीने बॉम्बर्सच्या उड्डाणाचे छायाचित्रे जारी केले आहेत.
- बॉम्बर्सने ओसान एअर बेसवरुन आकाशात झेप घेतली. हे ठिकाण उत्तर कोरियापासून केवळ 120 किमी दूर आहे.
- सांगितले जाते, की बी-1बी बॉम्बर्स गुआम येथील अँडरसन एअरफोर्स बेस निघून जाते.
का आकाशात घेतली झेप?
- दक्षिण कोरियाकडे आण्विक शस्त्रे नाहीत. अमेरिका आपल्यासोबत असल्याचा हा देश मानतो. दुसरीकडे उत्तर कोरिया प्रत्येक वेळेस बिं‍बवत असतो की तो एकटाच ताकदवान देश आहे.
- दक्षिण कोरियात अमेरिकेचे 28 हजारांपेक्षा जास्त जवानांच्या तुकड्या आहेत.
- उत्तर कोरिया अमेरिकेची दक्षिण कोरियातील उपस्थितीकडे दुर्लक्ष करु शकत नाही व स्वत:वर अणुबॉम्ब हल्ल्याची भीती मानतो.
- अमेरिकेचे दक्षिण कोरियातील एअरफोर्सचे कमांडर जनरल विन्सेंट ब्रुक्स म्हणतात, अमेरिका व दक्षिण कोरिया रोज उत्तर कोरियावर नजर ठेवून आहे. यामुळे आमची आघाडी आणखी मजबूत होईल.
दक्षिण कोरिया काय म्हणाला?
- दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मून सांग ग्यूनने सोमवारी सांगितले, दक्षिण कोरिया व अमेरिकन गुप्तचर मानते, की उत्तर कोरिया कधीही पुंगे-री साइटवर बंद पडलेल्या बोगद्यात 6 वी अणुबॉम्ब चाचणी घेऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे थाड व कसे काम करते...
बातम्या आणखी आहेत...