आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशिया,चीन, कोरियाशी लढण्याची ताकद नाही, अमेरिकेच्या लष्करप्रमुखांची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका - इराक आणि अफगाणिस्तानातील युद्धानंतर अमेरिकेची लष्करी स्थिती बिघडली आहे. त्यामुळे जर रशिया, चीन किंवा उत्तर कोरियासारख्या राष्ट्रांनी हल्ला केला, तर त्यांना लढा देण्याची ताकद अमेरिकेच्या लष्कराकडे नाही, अशी कबुली अमेरिकेचे लष्करप्रमुख मार्क मिली यांनी दिली आहे. कॅपिटल हिलमध्ये ते बुधवारी बोलत होते. अशी परिस्थिती असली तरीसुद्धा इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी संघटनांचा पूर्ण नायनाट करण्याइतपत क्षमता असल्याचेही ते म्हणाले.

जनरल मार्क मिली म्हणाले, इराक आणि अफगाणिस्तानच्या अनेक वर्षांच्या लढायांमुळे आर्थिक स्थितीवर खूप वाईट परिणाम झाला आहे. सैन्य कपातीच्या धोरणामुळेही लष्कराच्या वाढत्या ताकदीवर परिणाम झाला आहे. अमेरिकेचे लोक ज्याप्रमाणे अपेक्षा करतात, त्यानुसार लष्कराची तयारी नसल्याचेही मिली यांनी सांगितले.

अमेरिकेचे लष्करी उपग्रह पाडण्याच्या तयारीत चीन
दुसरीकडे, चीन आणि रशिया अमेरिकेचे लष्करी उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत अाहे, असा दावा वायुदल प्रमुख जनरल हायटन यांनी केला आहे. मंगळवारी अमेरिकेच्या संसदेत त्यांनी याविषयी माहिती सादर केली. ते म्हणाले, शत्रूंच्या अंतराळ क्षमतेत सतत वाढ होत आहे. वेळीच स्वत:ला सावरले नाही आणि सुधारणा केल्या नाहीत, तर अमेरिकेची अंतराळातील ताकद संपुष्टात येईल. अंतराळावर आपण किती प्रमाणात अवलंबून आहोत हे शत्रूंना चांगल्या प्रकारे माहिती आहे. चीनने डिसेंबरमध्ये पहिली स्पेस युद्ध आणि सायबर युद्ध तुकडी बनवली आहे. या धोरणात्मक सहायक तुकड्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यात इलेक्ट्रॉनिक आणि नेटवर्क क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. चीनने काउंटर-स्पेस टेक्नाॅलॉजी व्यापक प्रमाणावर विकसित केली आहे. त्यामुळे ते अमेरिकेच्या अंतराळ प्रणालीवर सहज निशाणा साधू शकतात.