आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवणारा ठराव अमेरिकन संसदेत मंजूर; 40 लाख कोटी करणार खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या ठरावाच्या मंजुरीने भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण संबंधांमध्ये आणखी जवळिकता निर्माण होणार आहे. (फाईल) - Divya Marathi
या ठरावाच्या मंजुरीने भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण संबंधांमध्ये आणखी जवळिकता निर्माण होणार आहे. (फाईल)
वॉशिंग्टन - भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवणाऱ्या ठरावाला अमेरिकेच्या संसदेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. या ठरावानुसार, अमेरिका आणि भारत संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी 621.5 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थात 40 लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. नॅशनल डिफेन्स अथॉरिटी अॅक्ट (एनडीएए) 2018 ठराव मंजूर करण्यासाठी 344 जणांनी होकार दिला. तर केवळ 81 जणांनी विरोधात मतदान केले. याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 
 
 
अॅमी बेरा यांच्या दुरुस्त्यांसह मंजुरी
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार अॅमी बेरा यांनी बिलमध्ये काही दुरुस्त्या सूचवल्या होत्या. त्यांनाही हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सने मंजुरी दिली. यानुसार, सेक्रेटरी ऑफ डिफेन्स, सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी एकमेकांशी चर्चा करून दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी एक व्यूहरचना तयार करावी.
- अॅमी बेरा म्हणाले, "अमेरिका जगातील सर्वात जुना आणि भारत सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र आहे. दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी व्यूहरचना बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ही दुरुस्ती मंजूर केल्याबद्दल मी आपला (संसद) आभारी आहे."
 
 
आता पुढे काय?
NDAA मंजूर झाल्यामुळे आता अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री एकमेकांशी चर्चा करून भारत आणि अमेरिकेत सहकार्य वाढवणार आहेत. यासाठी दोन्ही मंत्रालय एक विशेष व्यूहरचना बनवणार आहेत. त्यासाठी दोन्ही मंत्रालयांकडे 180 दिवस आहेत. हा कायदा कनिष्ठ सभागृहात मंजूर झाला आहे. यापुढे तो सिनेट अर्थात वरिष्ठ सभागृहात मंजुरीसाठी पाठवला जाईल. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावर स्वाक्षरी करून कायद्याला अधिकृत मंजुरी देणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...