आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेकडून एच-१ व्हिसा शुल्कात वाढ, भारतीय आयटी कंपन्यांवर अतिरिक्त बोजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मात देण्यासाठी अमेरिकेने एच-१ बी आणि एल-१ व्हिसाच्या शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. ४००० अमेरिकन डॉलर्सने हे शुल्क वाढवले आहे. द यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिस (यूएससीआयएस) ने दिलेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर २०१५ नंतर आलेल्या एच-१ बी व्हिसासाठीच्या अर्जांना हे शुल्क लागू होणार आहे.
एल-१ ए आणि एल-१ बी व्हिसासाठी हेच शुल्क ४, ५०० अमेरिकन डाॅलर्सने वाढवण्यात आले आहे. यासंबंधीच्या कन्सोलिडेटेड अॅप्रोप्रिएशन्स अॅक्ट २०१६ ला राष्ट्राध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. मूळ शुल्काशिवायची ही वाढ असेल.

नॅसकॉमचा अहवाल
सप्टेबर २०१५ मध्ये नॅसकॉमने यावरील अहवाल सादर केला होता. भारतीय आयटी कंपन्या दरवर्षी ७० ते ८० दशलक्ष डॉलर्स महसूल अमेरिकन ट्रेझरीत जमा करतात. नव्या निर्णयामुळे हीच रक्कम आता दरवर्षी १.४ ते १.६ अब्ज डॉलर्सपर्यंत जाणार आहे. डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मुद्दा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामांसमोर मांडला होता.