आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US POLL: हिलरींना पराभूत करा, पुतिन यांचे होते आदेश, हॅकिंगद्वारे मतदारांना केले प्रभावित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दस्‍तएवजामध्‍ये म्‍हटले आहे, पुतिन यांनी ट्रम्‍प यांच्‍या विजयासाठी पुरेपुर प्रयत्‍न केले. - Divya Marathi
दस्‍तएवजामध्‍ये म्‍हटले आहे, पुतिन यांनी ट्रम्‍प यांच्‍या विजयासाठी पुरेपुर प्रयत्‍न केले.
वॉशिंग्टन -अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्‍ट्राध्‍यक्ष पदाच्‍या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना पराभूत करण्‍याचे आदेश रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांनी दिल्याचा आरोप अमेरिकन गुप्‍तचर संस्थेने केला आहे. गुप्‍तचरांनी उघड केलेल्‍या नव्या दस्‍ताऐवजामध्‍ये याबाबत खुलासा केला आहे.
 
'हिलरी क्लिंटन यांनी आंतरराष्‍ट्रीय राजकारणात नेहमी रशियाविरोधी भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर, त्‍यांनी मला पदावरुन हटवण्‍याचेही प्रयत्‍न केले आहेत', असा आरोप पुतिन यांनी केल्‍याचे दस्‍ताऐवजात म्‍हटले आहे. हिलरी यांचे मेल हॅक करुन विकिलिक्‍सला त्‍याची माहिती पुरविल्याचे म्‍हटले आहे.

दुसरीकडे, निवडणूक प्रचारात ट्रम्‍प यांनी हिलरीविरोधात विकिलिक्‍सने उघड केलेल्‍या माहितीलाच आपले मुख्‍य शस्त्र बनविले होते. मात्र, त्‍यांनी या हॅकिंगचा निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नसल्‍याचे म्‍हटले आहे. लोकांचा माझ्यावर विश्‍वास आहे, म्‍हणून त्‍यांनी मला निवडून दिले, असे ट्रम्‍प यांनी म्‍हटले आहे. 
 
बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्‍या मेल हॅकींग प्रकरणाची चौकशी करण्‍याचे आदेश गुप्‍तचर संस्‍थेला दिले होते. त्‍यासंबधी हा अहवाल प्रसिद्ध करण्‍यात आला आहे. ओबामी यांनी अमेरिकेतून रशियाच्‍या सुमारे 35 अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. तसेच दोन रशियन गुप्‍तचर संस्‍थेवर देखील निर्बंध लादले आहेत.    
 
काय म्‍हटले आहे या चौकशी अहवालात? 
- अमेरिकेच्‍या गुप्‍तचर संस्‍थेने 31 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्‍ये राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या निवडणुकीला प्रभावित करणाऱ्या घटकांसंबंधी चौकशी करण्‍यात आली आहे. 
- यानुसार, पुतिन यांनी या निवडणुकीसंबंधी एक आदेश मंजूर केला होता. मुख्‍यत्‍वे हा आदेश राष्‍ट्राध्‍यांच्‍या निवडीवर परिणाम करणारा होता. 
- पुतिन यांनी आदेशामध्‍ये सरळ सरळ हिलरींविरोधात प्रचार करण्‍याचे आदेश दिले होते.  
- हिलरींची जनमाणसातील प्रतिमा मलिन होईल आणि मतदारांमध्‍ये त्‍यांच्‍याविषयी अविश्‍वास निर्माण होईल, अशी माहिती जनतेमध्‍ये पसरविण्‍यात यावी, असे आदेश रशियन गुप्‍तचर संस्‍थेला दिले गेले होते. 
- यासोबतच डेमोक्रॅटीक पक्षावरीलही लोकांचा विश्‍वास उडावा आणि त्‍यांचा जनाधार कमी व्‍हावा, असे प्रयत्‍न करण्‍याचे आदेश पुतिन यांनी दिले होते. 
- या दस्‍ताऐवजामध्‍ये अमेरिकेच्‍या गुप्‍तचर संस्‍थेने स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, आम्‍ही फार सावधपूर्वक चौकशी केली आहे. दस्‍ताऐवजामध्‍ये करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक दाव्‍याचा आमच्‍याकडे पुरावा आहे. चौकशीमध्‍ये असे स्‍पष्‍ट आढळून आले आहे की, पुतिन यांनी ट्रम्‍प यांच्‍या विजयासाठी पुरेपुर प्रयत्‍न केले.  

ट्रम्‍प म्‍हणाले, रशिया आणि‍ चीन अमेरिकेच्‍या सुरक्षेला खिंडार पाडत आहेत.
- यावर भाष्‍य करताना ट्रम्‍प म्‍हणाले आहेत, चीन, रशिया तसेच काही इतर राष्‍ट्रे अमेरिकेच्‍या सरकारी व्‍यवस्‍थेमध्‍ये हस्‍तक्षेप करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. ते एकप्रकारे आपल्‍या सुरक्षेला‍ खिंडार पाडत आहे. 
- ही राष्‍ट्रे अमेरिकेतील व्‍यवसाय आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण संस्थांमध्‍ये घुसखोरी करीत आहे. 
- मात्र, हे म्‍हणणे चुकीचे आहे की, त्‍यांनी अमेरिकेच्‍या निवडणुकीला प्रभावित केले किंवा मला निवडुन आणण्‍यामध्‍ये त्‍यांची काही भूमिका होती. 
- याआधीही रिपब्लिकन राष्‍ट्रीय समिती (आरएनसी) यांची वेबसाईट हॅक करण्‍याचा प्रयत्‍न झाला आहे. त्‍यामध्‍ये हॅकर्सना यश मिळाले नव्‍हते. 
- पदाचा कारभार हाती घेतल्‍यावर मी एक टीम ब‍नविणार आहे. जी अमेरिकेला अधिक सुरक्षित कसे बनवायचे यासंबंधी 90 दिवसांत अहवाल सादर करतील. 
- दोन हफ्त्‍यानंतर मी शपथ घेणार आहे. मी विश्‍वासाने सांगतो की, अमेरिकेची सुरक्षा ही माझी प‍हिली प्राथमिकता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  

पुढील स्लाइड्‍सवरील Q&A द्वारे जाणून घ्‍या, काय होता हॅकिंगचा हेतू?... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...