आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात कट्टरपंथीय सक्रीय, सावध राहा -US प्रशासनाचा नागरिकांना इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आशियातील देशांमध्‍ये अमेरिकी नागरिकांवर हल्‍ले होण्‍याची भिती अमे‍रिकी प्रशासनाने व्‍यक्‍त केली आहे. - Divya Marathi
दक्षिण आशियातील देशांमध्‍ये अमेरिकी नागरिकांवर हल्‍ले होण्‍याची भिती अमे‍रिकी प्रशासनाने व्‍यक्‍त केली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकने परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत. पाकिस्‍तान, अफगाणिस्‍तान आणि बांगलादेशामध्‍ये जाण्‍यास नागरिकांना मनाई करण्‍यात आली आहे. तसेच भारतात प्रवास करताना सावध राहण्यास नागरिकांना सांगण्यात आले आहे. भारतात कट्टरतावादी संघटना सक्रीय झाल्‍या असून त्‍यांच्‍यापासून अमेरिकी नागरिकांना धोका असल्याचे, या सूचनांमध्‍ये म्‍हटले आहे.  
 
अमेरिकी प्रवाशांना इशारा  
- अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र विभागाने सोमवारी रात्री याबाबत सूचना जाहीर केल्‍या. 'दक्षिण आशियामध्‍ये दहशतवादी संघटना अधिक आक्रमक झाल्‍या असून अमेरीकी कार्यालय, अमेरीकी नागरिक आणि त्‍यांच्‍या हिताला बाधा पोहोचवण्‍याचा प्रयत्‍न करु शकतात,' असे यामध्‍ये म्‍हटले आहे.  
- अमेरीकी नागरिकांना अफगाणिस्‍तानमध्‍ये जाण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे. 'अफगाणिस्‍तानमध्‍ये असा एकही भाग नाही जो हिंसेपासून मूक्‍त आहे. अशा परिस्थित अमेरिकी नागरिकांनी तेथे जाणे धोकादायक ठरु शकते,' असे अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र विभागाने सांगितले.  
- पाकिस्‍तानबद्दल मार्गदर्शक सूचनांमध्‍ये उल्‍लेख करताना, या देशात अत्‍यंत घातक दहशतवादी आणि कट्टरपंथीय संघटना सक्रीय आहेत. त्‍यामुळे या देशात जाणेसुध्‍दा तुमच्‍यासाठी धोकादायक ठरु शकते.' असा इशारा नागरिकांना दिला आहे.   

घृणास्पद हिंसेमुळे अमेरिकेत भीती
- अमेरिकेत फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात भारतीय, यहुदी, मुस्लिम आणि इतर बाहेरच्या लोकांविरुद्ध झालेल्या हिंसक घटनांनी या समुदायांना चिंतीत केले आहे. या सर्व घटना दुसऱ्या समुदायाविरुद्ध तिरस्‍काराच्‍या लाटेचे संकेत देत आहेत. २२ फेब्रुवारीला कन्सॉसमध्ये दोन भारतीयांना गोळ्या घालणारी व्यक्ती जोरात ओरडली होती, ‘माझ्या देशातून चालते व्हा.’
 
भारतीयांवरील हल्ल्याची 4 प्रमुख कारणे
1. भारतीय अमेरिकेत आल्यानंतर निवडक लोकांबरोबरच ओळख वाढवतात. काही घ्यायचे असेल तरी इंडियन स्टोअर्समध्येच जातात, अमेरिकन नागरिकांशी जवळीकता वाढवत नाहीत. 
2. हल्लायेच दुसरे कारण पोशाख असे सांगितले. भारतीय पोशाख परिधान करून कार्यक्रमात गेल्यास कोणीतरी बाहेरून येऊन त्यांची संस्कृती आपल्यावर लादत आहे, असे त्यांना वाटते. 
3. गुरूींदर म्हणाले, अमेरिकन्सबरोबर मैत्री वाढवायला हवी. सर्वांसोबत बोलायला हवे. बोलतानाही इंग्रजीत बोलायला हवे. पण भारतीय तसे करत नाहीत. 
4. अमेरिकेत सुमारे 33 लाख भारतीय आहेत. पण पंजाबी, गुजराती, दक्षिण भारतीय असे त्यांचे गट आहेत. ते कधी एकत्र येत नाहीत.
 
ट्रम्प यांनी जारी केला नवा प्रवास बंदी आदेश, इराकवरील बंदी हटली
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या प्रवास बंदी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. मागील आदेश २७ जानेवारीला जारी करण्यात आला होता. त्यावरील अंमलबजावणी न्यायालयाच्या आदेशानंतर रोखावी लागली होती. नव्या आदेशात सहा मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील आदेशात सात देश होते.

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रॅक्स टिलरसन यांनी सांगितले की, इराकच्या पंतप्रधानांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढण्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्या देशाचे नाव यादीतून हटवण्यात आले आहे. आता ही बंदी सिरिया, इराण, लिबिया, सोमालिया आणि सुदानवर लागू राहील.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...