आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक हल्ल्यांना प्रत्युत्तर: अमेरिकेने सिरियावर डागली 59 क्षेपणास्त्रे, 9 जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेने सोडलेले एक क्षेपणास्त्र. - Divya Marathi
अमेरिकेने सोडलेले एक क्षेपणास्त्र.
दमास्कस - सिरियातील रासायनिक हल्ल्यानंतर तीन दिवसांनी अमेरिकेने सिरियातील एका हवाई तळावर शुक्रवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत ४ मुलांसह ९ नागरिक ठार झाले, अशी माहिती ‘सना’ या राज्य वृत्तसंस्थेने दिली. शायरात हवाई तळाबाहेर शायरात नावाच्याच गावात हे क्षेपणास्त्र धडकले होते. तेथे पाच जण ठार झाले. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. अल-हमरात या खेड्यातही अमेरिकन क्षेपणास्त्र धडकले, त्यात एका मुलासह चार नागरिक ठार झाले. शायरात हवाई तळापासून चार किमीवरील अल-मंझूल या गावावर झालेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले.

अमेरिकेने शायरात तळावर तब्बल ५९ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. सिरियाच्या सरकारने बंडखोरांच्या ताब्यातील शहरावर मंगळवारी रासायनिक हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. शायरात तळावरूनच रासायनिक हल्ला करण्यात आला होता. मोठी जीवितहानी टाळण्यासाठी रशियाच्या कमांडर्सना या क्षेपणास्त्र हल्ल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. इस्रायल, तुर्की, सौदी अरेबिया, जपान, जर्मनीसह विविध देशांनी अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला, तर रशिया, चीन, इराणने विरोध केला आहे.
 
अमेरिकेचा हल्ला मूर्खपणाचा : असद
दमास्कस - अमेरिकेन केलेला हल्ला हा मूर्खपणे आणि बेजबाबदारपणे केलेली कारवाई आहे, त्यातून अमेरिकेचे राजकीय आणि लष्करी अंधत्व दिसते, अशी तिखट प्रतिक्रिया सिरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या कार्यालयातर्फे देण्यात आली. आम्ही बंडखोरांच्या गटाच्या शस्त्रसाठ्यावर रासायनिक हल्ला केला होता, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता बंडखोरांच्या विरोधात दुप्पट क्षमतेने कारवाई केली जाईल. बंडखोरांवर कारवाई करण्याचा आमचा निर्धार आणखी भक्कम झाला आहे, असे कार्यालयाने म्हटले आहे.
 
सुरक्षा परिषदेची आज बैठक
संयुक्त राष्ट्रे - अमेरिकेने सिरियावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची स्थानिक वेळेनुसार ११.३० वाजता बैठक होत आहे, अशी माहिती अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. रशियाने बैठकीची मागणी केली होती. अमेरिकेने सार्वभौम देशावर हल्ला केला आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही 
रशियाने नोंदवली होती.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, ट्रम्प यांची भूमिका... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...