आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us Law Makers Warns Obama Pakistan May Use F 16s Against India

एफ-16 चा वापर पाकिस्तान भारताविरुद्ध करू शकतो, अमेरिकेच्या खासदारांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पाकिस्तानला एफ-16 फाइटर जेट्स विकण्‍यास अमेरिकेच्या खासदारांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. पाकिस्तान या विमानांचा वापर दहशतवादाविरुद्ध लढण्‍याऐवजी भारतावर हल्‍ला करण्‍यास करू शकतो, असा इशारा देत त्‍यांनी ओबामा सरकारने या व्यवहाराचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. अमेरिकेचे खासदार काय म्हणाले...
- बुधवारी(ता.27) अमेरिकन कॉंग्रेसच्या(संसद) अधिवेशनात खासदार मॅट सालमॉन म्हणाले, की त्यांच्यासह अनेक खासदारांचा या कराराला विरोध आहे.
- भारत आणि पाकिस्तानमध्‍ये आजही तणाव आहे. पाकिस्तान या फायटर जेट्सचा वापर दहशतवाद्यांविरुध्‍द करेल असे वाटत नाही. वास्तविक ती भारताविरुध्‍द वापरली जाऊ शकतात, असे मॅट यांनी सांगितले.
का होते चर्चा?
- कॉंग्रेसची आशिया-पॅसिफिक विभागाची समिती अफगाणिस्तान आणि पाकिस्तानबाबतची चर्चा करीत होती. यावेळी या दोन्ही देशांचे अमेरिकन प्रतिनिधी रिचर्ड ओल्सनही उपस्थित होते.
- दुसरे एक खासदार ब्रॅड शर्मन म्हणाले, की पाकिस्तान इतक्या महागड्या जेट्सचा वापर का करेल याचा विचार झाला पाहिजे. नाहीतर हा करार भारताशी बरोबरी करण्‍यासाठी तर होत नाहीना?
- पाकिस्तानला आपण केवळ अशी शस्त्रे विकली पाहिजे जी दहशतवाद्यांविरुध्‍द वापरली जाऊ शकतात, भारतावर नव्हे.

सिनेटने रोखला आहे करार
- ओबामा सरकारची इच्छा असूनही पाकिस्तानला अद्याप एफ-16 फाइटर जेट्स विकू शकलेली नाही. सिनेटने हा करार रोखला आहे.
- मॅट सालमॉन म्हणाले, की 9/11 नंतर आपण पाकिस्तानला 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मदत केली आहे. तरीही तेथील दहशतवाद आणि दहशतवाद्यांवर निर्बंध आणलेले नाही. कारण पाकिस्तान दहशतवादाचा एक हत्यार म्हणून वापर करत आहे.
- ते म्हणाले, की पाकिस्तानी लष्‍कराच्या मदतीने दहशतवादी भारतात हल्ले करतात. मात्र ओल्सन यांनी ओबामा सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
पाकिस्तानजवळ किती आहेत फाइटर्स?
पाकिस्तानजवळ आता 70 पेक्षा जास्त एफ-16 फाइटर जेट आहेत. या देशाच्या हवाई दलाच्या ताफ्यात फ्रेन्च आणि चिनी युध्‍द विमाने आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक अब्ज डॉलरचे मिलिट्री हार्डवेअर आणि इक्विपमेंट मिळण्‍याची पाकिस्तानची विनंती मान्य केली होती.