आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ : पहाटे पुन्हा भुकंपाचे धक्के, अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये मदतकार्य कऱणारे अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर. - Divya Marathi
नेपाळमध्ये मदतकार्य कऱणारे अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर.
काठमांडू - नेपाळमध्ये बुधवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. पण तीव्रता कमी असल्याने ते आफ्टरशॉक असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत तीन वेळा हे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर यांची तीव्रता 4.8, 4.2 आणि 5.1 एवढी होती. त्यामुळे याठिकाणच्या लोकांमध्ये अजूनही भीतेच वातावरण आहे.

यापैकी भूकंपाचा अखेरचा धक्का पहाटे 3 वाजता बसला होता. जमिनीपासून खाली 15 ते 20 किलोमीटर अंतरावर सर्व भुकंपांचे केंद्र होते. मंगळवारी काठमांडूच्या जवळ कोडारी आणि चीन सीमा झाम मध्ये भुकंपाचे केंद्र होते. दरम्यान भुकंपामध्ये मरणाऱ्यांचा आकडा 68 वर गेला आहे. मंगळवारी नेपाळमध्ये भुकंपाचा सर्वात मोठा धक्का रिक्टर स्केलवर 7.4 एवढया तीव्रतेचा होता. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्येही हा धक्का जाणवला होता. दरम्यान मंगळवारी भुकंपग्रस्त भागांमध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकेच्या हेलिकॉप्टरचा अद्याप शोध लागलेला नाही. अमेरिकेचे नेव्ही कॅप्टन क्रिश सिंस म्हणाले की, अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर UH-1 Huey सहा जवान आणि दोन नेपाळी नागरिकांसह भूकंपाच्या वेळी भूकंपग्रस्त भागात होते.

इंधन संपल्याचे कारण?
नेपाळमध्ये बेपत्ता झालेले अमेरिकेच्या लष्कराचे हेलिकॉप्टर भूकंपग्रस्तांसाठी मदत कार्य करत होते. हेलिकॉप्टरद्वारे अमेरिकेचे जवान भूकंपग्रस्त भागात मदत साहित्य पोहोचवण्याचे काम करत होते. त्यामुळे इंधन संपल्याच्या कारणामुळे हेलिकॉप्टरचा शोध लागत नसावा असे समजले जात आहे. तसेच हेलिकॉप्टरचा अपघात झाला असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्कराचे कर्नल स्टिव्ह वॉरेन म्हणाले की, हेलिकॉप्टर बेपत्ता होण्यापूर्वी अमेरिकेच्या लष्करातील चालकाने इंधनाबाबत काहीतरी बोलल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता.

रात्रीपर्यंत सुरू होते ऑपरेशन
तीन जवानांनी व्ही -22 रोटर विमानाच्या मदतीने 90 मिनिटांपर्यंत सर्च ऑपरेशन राबवल्यानंतरही यश आले नाही, त्यामुळे हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले. मात्र नेपाळी सैनिक जमिनीवर सर्च ऑपरेशन राबवत आहेत. बेपत्ता हेलिकॉप्टर गेल्या महिन्यात आलेल्या भूकंपानंतर मदत कार्यासाठी आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTO