आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारची वर्षपूर्ती: अमेरिकन माध्‍यमांनी मोदींच्या \'मेक इन इंडिया\'वर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी(ता.26) एक वर्ष पूर्ण केले. यानिमित्त अमेरिकन माध्‍यमांनी पंतप्रधान मोदींच्या महात्त्वाकांक्षी 'मेक इन इंडिया' या योजनेला लक्ष्‍य केले आहे. सरकारवर टीका करताना वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले, की मेक इन इंडिया या योजनेची केवळ बातम्या येत आहे. अद्याप रोजगार वाढण्‍याची गती खूप कमी आहे. दुसरीकडे न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखानुसार नरेंद्र मोदींना वास्तवाशी सामना करावा लागेल.

वॉल स्‍ट्रीट जर्नलने 'इंडियाज मोदी अॅट वन ईयर: युफोरिया फेज' इज ओव्हर, चॅलेंजेस लूम' या शीर्षकाने लेख छापला आहे. त्यात लिहिले, की मोदी सरकारला जनतेने देशात बदल आणि अर्थव्यवस्थेत संजीवनी यावे या करिता स्पष्‍ट बहुमत दिले. परंतु परिस्थितीत कोणतेही परिवर्तन दिसत नाही.लेखानुसार, उत्पादन क्षेत्रात मोदी सरकारने ज्या मेक इन इंडिया योजनेची सुरुवात केली आहे, ती फक्त बातम्याच दिसत आहे. आताही अर्थव्यवस्था डळमळीत स्थितीत आहे. निर्यातही कमी होत चालली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारामधून 2 अब्ज डॉलर रुपये काढून घेतले आहे.
मोदींना करावा लागणार वास्तवाशी सामना - न्यूयॉर्क टाइम्स
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताच्या विश्‍लेषणानुसार मोदींना वास्तवाशी सामना करावा लागणार आहे. त्यांचे बहुतेक कार्यक्रम केवळ अंदाजित आहे. विदेशी नजरेतून पाहिले, तर भारत एक उगवता देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था चीनच्या पुढे जाण्‍याची शक्यता वर्तवले जात आहे.