आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकवर भारतीय लष्कराच्या कारवाईचे अमेरिकेकडून समर्थन; ट्रम्प यांनी रोखला 1200 कोटींचा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - दहशतवाद्यांना आणि घुसखोरांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर भारताने केलेल्या जबरदस्त कारवाईचे अमेरिकेने समर्थन केले आहे. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत दहशतवाद पुरस्कृत पाकला मुत्सद्दीपणे वेगळे करण्याच्या प्रयत्ना असलेला भारत सीमा पार करून कठोर करवाई सुद्धा करू शकतो असे अमेरिकेच्या गुप्तचर विभाग प्रमुखांनी ठणकावले आहे. याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पाकिस्तानला दिल्या जाणारा 1200 कोटी रुपयांचा निधी रोखला आहे. 
 
भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजेन्स एजंसी (डीआयए)चे प्रमुख ले. जनरल विंसेन्ट स्टीवर्ट म्हणाले, "भारत, पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दीरीत्या वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहेच... आता इस्लामाबाद विरुद्ध कठोर कारवाई सुद्धा करू शकतो." स्टीवर्ट यांनी सिनेटच्या एका सशस्त्र सेवा समितीसमोर बोलताना हे मत मांडले आहे. 
- भारतीय लष्कराने मंगळवारीच दहशतवाद पुरस्कृत पाकच्या सीमा चौक्या उद्ध्वस्त केल्या. तसेच यासंदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा जाहीर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी स्टीवर्ट यांची ही प्रतिक्रिया भारतासाठी अतिशय महत्वाची मानली जात आहे. 
- स्टीवर्ट यांनी सांगितल्याप्रमाणे, "हिंदी महासागराच्या हद्दीत आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी भारत लष्कराचे आधुनिकीकरण करत आहे. यासोबतच, समस्त आशिया खंडात आपले आर्थिक आणि मुत्सद्दी वर्चस्व सुद्धा वाढवत आहे."
- "गेल्या काही महिन्यांपासून भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध आणखी बिघडले आहेत."
 
हेही वाचा
बातम्या आणखी आहेत...