आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव; 65 हजार एकर परिसर बेचिराख, हजारो बेघर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात पुन्हा वणवा पेटला आहे. कित्येक प्रयत्न करूनही आग काही शांत होण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत 65 हजार एकराचा परिसर आगीत भस्मसात झाला आहे. त्यामुळे, लॉस एंजेलिसच्या सीमावर्ती भागातील लोकांनाही घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आगीने 27 हजार लोक बेघर झाले. तसेच वीज केंद्रेही खाक झाल्याने दिड लाखांहून अधिक लोक आंधारात जगत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात कॅलिफोर्नियाच्या नापा आणि सोनोमा काउंटी येथे आग लागली होती. त्यामध्ये 10 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे. 

 

> कॅलिफोर्निया प्रांतात नैसर्गिक संकट घोषित करण्यात आले असून 27 हजार लोकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. 
> 150 घरे बेचिराख झाली, तसेच अनेक भागांमध्ये विद्युत केंद्रही उद्ध्वस्त झाले. काही भागांमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी वीज कापण्यात आली आहे. 
> कॅलोफोर्नियातील आगीचा सर्वाधिक फटका 1 लाखांची लोकसंख्या असलेल्या व्हेंच्युरा शहराला बसला आहे. येथील लोकांच्या घरांसह शेत सुद्धा राख झाले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अग्नितांडवाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...