आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US मध्ये प्रथमच : PAK ला दहशतवादी ठरवण्याच्या बाजुने विक्रमी 6.65 लाख वोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकला दहशतवादी ठरवण्यासाठी रिपब्लिकन कांग्रेसमध्ये बिल आणण्यात आले आहे. - Divya Marathi
पाकला दहशतवादी ठरवण्यासाठी रिपब्लिकन कांग्रेसमध्ये बिल आणण्यात आले आहे.
वॉशिंगटन - पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवण्यासाठी समोर ठेवण्यात आलेले पिटीशन अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध पिटीशन बनत आहे. आतापर्यंत 6 लाख 65 हजार 769 वोट मिळाले आहेत. म्हणजेच ओबामा अॅडमिनिस्ट्रेशनच्या रिस्पॉन्ससाठी गरजेचे असल्याच्या पाच पट अधिक आकडा आहे. यापूर्वी कोणत्याही व्हाइट हाऊस पिटीशनला 3.20 लाखांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत.
1 लाख वोट गरजेचे..
- पिटीशनमध्ये नमूद आहे की, पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करावे अशी विनंती आम्ही अमेरिकेच्या प्रशासनाला करत आहोत.
- सोमवारपर्यंत पिटीशनवर 6 लाख 13 हजार 830 लोकांनी साइन केले होते.
- मंगळवारी झालेल्या झालेल्या फायनल काऊंटिंगमध्ये यात आणखी 51 हजार 939 मतांची भर पडली. त्यामुळे एकूण वोट 6 लाख 65 हजार 769 झाले.
- वोटचा विचार करता हे अमेरिकेतील आजवरचे सर्वात पॉप्युलर पिटीशन बनले आहेत. यापूर्वी कोणत्याही पिटीशनला 3.20 लाखांपेक्षा अधिक वोट मिळालेले नाहीत.
- मात्र व्हाइट हाऊस संपूर्ण चौकशीनंतरच फायनल टॅली प्रसिद्ध करणार आहे.
- पिटीशनवर विचार करण्यासाठी 1 लाख वोट असणे गरजेचे असते.
- अशा प्रकारच्या पिटीशनची परंपरा 2011 मध्ये सुरू झाली होती.

सिग्नेचर प्रोसेसचे वैशिष्ट्य..
- पिटीशनला सपोर्ट करण्यासाठी सोशल मीडियावर लोकांनी मोठा सहभाग दाखवला.
- 24 तासांतच 1 लाख लोकांनी साइन केले होते.
- पाच लाख सिग्नेचरचा आकडा पार करणारे हे पहिलेच पिटीशन आहे.
- बलूच-अमेरिकन नागरिकांनीही 'फ्री बलूचिस्तान फ्रॉम पाकिस्तान इलिगल ऑक्यूपेशन' नावाने पिटीशन केली आहे.
बातम्या आणखी आहेत...