आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US इलेक्शन: अंतराळवीरानेे 400 km अंतरावरील स्पेस स्टेशनवरून बजावला मतदानाचा हक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'चा अंतराळवीर (एस्ट्रोनॉट) शेन किम्ब्रॉ यांनी 400 किलोमीटर अंतरावरील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून (ISS) मतदानाचा हक्क बजावला आहे. एवढेच नव्हे तर, शेन किम्ब्रा यांनी अंतराळातून मतदान करण्याचा बहुमान मिळवला आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या 58 व्या अध्यक्षपदासाठी आज (8 नोव्हेंबर) मतदान होत आहे. निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन विरुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. उभय नेते मतदारांचा कौल मागत आहेत.

शेेन यांनी थेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून (ISS) पहिल्यांदा मतदान केले. ते 19 ऑक्टोबरला कजाखिस्तानच्या बेकानूरहून रशियन सोयूज रॉकेटने अंतराळात रवाना झाले होते. ते चार महिने अंतराळातच राहाणार आहेेत.

टेक्सास कायद्यानुसार अंतराळातून मतदान करण्याचा अधिकार....
- अमेरिकेत 1997 पासून टेक्सास कायद्यानुसार अंतराळवीराला अंतराळातून मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. डेव्हिड वोल्फ यांनी अंतराळातून पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला होता. वोल्फ यांनी रशियाचे अंतराळ स्टेशन मीरमधून स्थानिक निवडणुकीसाठी मतदान केले होते.
- अध्यक्षपदासाठी मतदान करण्याचा बहुमान लेरॉय शियाओ यांना मिळाला होता. 2004 मध्ये शियाओ यांनी अंतराळातून मतदान केले होते.
- नासाचे सर्वात जास्त अंतराळवीर हे ह्यूस्टन भागात राहातात.

'नासा'ने काय सांगितले...?
- नासाने सांगितले की, 'आमचे अंतराळवीर सध्या अंतराळात आहेत. त्यापैकी शेन यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला आहे.
- अंतराळातून मतदान करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक ईमेल सिस्टिम असते. ही सिस्टिम जॉनसन स्पेस सेंटरशी संलग्न असते.
-सर्वात आधी मिशन कंट्रोल सेंटरमधून स्पेस स्टेशनला अंतराळवीरचा सिक्योर अकाउंटमध्ये ईमेल पाठवला जातो. अंतराळवीरला आपले मत नोंदवून ईमेल परत पाठवावा लागतो.
बातम्या आणखी आहेत...