आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama Pokes Fun At Hilary Clinton News In Marathi

हिलरी क्लिंटन, बेंजामिन नेतन्याहूंची बराक आेबामांकडून टर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा इतरांची टिंगल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या वेळी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि आपल्याच पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची टर उडवली. निमित्त होते व्हाइट हाऊस कव्हर करणाऱ्या पत्रकारांसाठी आयोजित वार्षिक डिनरचे.
ओबामा 53 वर्षांचे आहेत. त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ अद्यापही दोन वर्षे राहिला आहे. तरुण पत्रकारांसाठी शिष्यवृत्तीच्या निधीची उभारणी करणे हादेखील या कार्यक्रमामागील उद्देश होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून माझा वृद्धापकाळ झपाट्याने वाढू लागला आहे, पण मी एवढाही म्हातारा झालेलो नाही बरे का? मात्र, बोएनर यांनी तर माझ्यावरील अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केलेली दिसते. म्हणूनच तर त्यांनी नेतन्याहू यांना निमंत्रण देऊन टाकले. बोएनर रिपब्लिकन पार्टीचे नेते आहेत. त्याशिवाय अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती आहेत. त्यांनी आेबामा यांचा विरोध असतानाही नेतन्याहू यांना संसदेत भाषण करण्यासाठी निमंत्रण दिले होते.
त्यानंतर हिलरींचा नंबर होता. माझे एक मित्र आहेत. काही आठवड्यांपूर्वीच ते लाखो डॉलरची कमाई करत होते. आता ते आयोव्हामध्ये एका व्हॅनमध्ये जीवन व्यतित करू लागले आहेत, असा टोमणा त्यांनी मारला. हिलरी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची िनवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.