आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा, अशी आहे बराक ओबामांची कॅडिलीक वन बिस्ट कार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. त्यांच्यासाठी भारताने अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली होती. मात्र, अमेरिकी सुरक्षा यंत्रणाही आपल्या राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेत कोणतीही उणीव ठेवली नव्हती. भारतात फिरताना ओबामा स्वत:ची 'द बीस्ट' ही कार घेऊन आले होते. या कारची वैशिष्ट्ये पाहता अमेरिकन सुरक्षा यंत्रणा भारतात ओबामांना हीच कार वापरण्याचा आग्रह का धरत होत्या, याचे कारण स्पष्ट होते. या कारची तुलना चार चाकांचा रणगाडा अशी केल्यास वावगे ठरणार नाही.

जनरल मोटर कंपनीकडून तयार करण्यात आलेली 18 फूट आणि फूट 10 इंच उंचीची ही कार आठ इंची जाडीच्या आर्मर कवचाने सुसज्ज आहे. याशिवाय, गाडीच्या बुलेटप्रुफ काचांची जाडी पाच इंच इतकी आहे. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केमिकल शस्त्रांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळते. गाडीच्या दरवाजांची तुलना करायची झाल्यास त्यांचे वजन बोईंग- 757 या विमानाच्या दरवाज्यांइतके जड आहे.

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्समध्ये पाहा, कशी आहे बराक ओबामांची कॅडिलीक वन बिस्ट कार...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...