आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांची उत्तर कोरियाला दबंग स्टाईल धमकी; म्हणाले, एवढी फायरिंग करेन की...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धमक्या देणे उत्तर कोरियाच्या आरोग्याला घातक आहे - ट्रम्प (फाइल) - Divya Marathi
धमक्या देणे उत्तर कोरियाच्या आरोग्याला घातक आहे - ट्रम्प (फाइल)
वॉशिंग्टन - वारंवार अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या उत्तर कोरियाच्या हुकुमशहाला डोनाल्ड ट्रम्प यांनी दबंग स्टाईल धमकावले आहे. नॉर्थ कोरियाने आम्हाला धमक्या देऊ नये, अन्यथा एवढी फायरिंग करू की जगाला बघावेसे वाटणार नाही अशा शब्दात ट्रम्प बरसले आहेत. 
 

धमक्या तुमच्या आरोग्याला घातक...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यू जर्सी येथे सुट्टी घालवण्यासाठी गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाच्या धमक्यांवर बरसले आहेत. "धमक्या देणे नॉर्थ कोरियाच्या आरोग्याला घातक ठरू शकते. अशाच धमक्या दिल्या तर तुमच्यावर एवढी फायरिंग केली जाईल की जगाला पाहावेसे वाटणार नाही. किम जोंग उन (हुकुमशहा) ज्या पद्धतीने धमक्या देत आहे, त्या धमक्या सामान्य तर मुळीच नाहीत." 
- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र उत्तर कोरियाने आता अण्वस्त्र वॉरहेड तयार केले असून त्यांना मिसाईलवर लावण्याचे तंत्र देखील कथितरीत्या विकसित केले आहे. 
- या वॉरहेड आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने उत्तर कोरिया थेट अमेरिकेच्या मेन लॅन्डवर अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देत आहे. त्यावरच ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
 

आतापर्यंत 5 अण्वस्त्र चाचण्या
- उत्तर कोरियावर चोहीकडून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संरक्षणाचे निर्बंध असतानाही त्यांनी 5 अण्वस्त्र चाचण्या घेतल्या आहेत. 
- पहिली चाचणी 2006, दुसरी मे 2009, तिसरी फेब्रुवारी 2012, चौथी चाचणी जानेवारी 2016 आणि पाचवी चाचणी सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आली. शेवटच्या चाचणीत अण्वस्त्राची क्षमता तब्बल 20-30 किलोटन असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या चाचणीला अणुबॉम्ब पेक्षा हजार पटीने घातक अशा हायड्रोजन बॉम्बशी तुलना करण्यात आली. 
- उत्तर कोरियाकडे हे क्षेपणास्त्र अमेरिकापर्यंत धडकावण्यासाठी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आणि मिसाईलवर वॉरहेड लावण्याचे तंत्रज्ञान नव्हते. तेच तंत्रज्ञान आता विकसित केल्याचा दावा उत्तर कोरिया करत आहे.
बातम्या आणखी आहेत...