आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्युबासंबंधी ट्विटमुळे व्हाइट हाऊसवर प्रश्नांचा मारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन : क्युबासोबत अमेरिकेचे संबंध सुधारण्याच्या आशा निर्माण झाल्या असतानाच आता त्यात पुन्हा विघ्न येण्याचे संकेत मिळत आहेत. क्युबासोबत अमेरिका मवाळ धोरण ठेवणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ऐतिहासिक विरोधक क्युबाशी संबंध सुधारणे राजनयिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या परवडणारे नाही, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष बराक आेबामांनी क्युबाशी संबंध सुधारण्याविषयी सकारात्मकता दाखवली होती. ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांनी हेे धोरण बाद ठरवले आहे.
व्हाइट हाऊसने माध्यमांसमोर केला खुलासा : ट्रम्प यांच्या ट्विटनंतर अनेक प्रश्न विचारले गेले. व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी यावर खुलासा केला. एका ट्विटमुळे भविष्यात काय होणार आहे हे मला आत्ताच सांगता येणार नाही. मात्र ट्विटमध्ये केलेले वक्तव्य प्रत्यक्षात येणे इतके सोपे नाही इतकेच मी सध्यातरी सांगू शकतो. धोरणे इतक्या लवकर बदलणे अवघड असते, असा खुलासा माध्यमांसमोर जोश यांनी केला. यात आर्थिक हितसंबंधाचाही भाग आहे.
व्हाइट हाऊसने दिला ट्रम्प यांना इशारा : अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची दिशा निश्चित झालेली असताना त्याला असे तडकाफडकी फिरवता येणार नाही, असा इशारा व्हाइट हाऊस प्रशासनाने ट्रम्प यांना दिला आहे. कोणताही करार अचानक रद्द करणे दूरदर्शीपणाचे लक्षण नव्हे. त्याचे मूल्य अमेरिकेलाही चुकवावे लागते याची जाणीव ट्रम्प यांना व्हाइट हाऊस प्रशासनाने दिली. क्युबासोबत सुरू असलेल्या वाटाघाटींना असे तोडणे परवडणारे नसल्याचे यात म्हटले आहे.
अमेरिकन जनता, उद्योजकांचे मतही महत्त्वाचे : क्युबाशी संबंध वृद्धिंगत करण्यात जनता व उद्योजकांच्या स्वारस्यालाही महत्त्वाचे स्थान अाहे. त्यामुळे आत्ताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...