आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्षपद : पराभूत करणाऱ्यांचा पाठिंबा, हिलरींचा कॅरोलिनात विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबिया (अमेरिका) - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा दक्षिण कॅरोलिनाच्या डेमोक्रॅट्सनी हिलरी क्लिंटन यांना मतांचा भरभरून कौल दिला. २००८ मध्ये याच प्रांताने त्यांचे प्रतिस्पर्धी बराक आेबामा यांच्या बाजूने आपले वजन टाकले होते. अर्थात समर्थन केले होते. पुढे तेच राष्ट्राध्यक्ष बनले.

हिलरी यांना १० पैकी ९ अाफ्रिकी-अमेरिकीने पाठिंबा दिला आहे. शनिवारी झालेल्या निवडणुकीत हिलरी यांना ७३.५ टक्के मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांना केवळ २६ टक्के मते पडली. आता सर्वांची नजर सुपर ट्यूसडेवर असतील. त्या दिवशी १२ राज्यांत निवडणूक होणार आहे. ताज्या निवडणुकीमुळे हिलरींचे पारडे जड झाले आहे. आतापर्यंत पक्षाच्या वतीने चार राज्यांत झालेल्या प्राथमिक निवडणुकीत हिलरी यांना तीन राज्यांत विजय मिळाला आहे. सोमवारपासून निवडणूक प्रचार मोहीम राष्ट्रीय पातळीवर सुरू होईल. आम्ही प्रत्येक राज्यात प्रत्येक मतासाठी लढू, असे हिलरी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सँडर्स म्हणाले, ही निवडणुकीची केवळ सुरुवात आहे. आम्ही न्यू हॅम्पशायरमध्ये विजय झाला होताे. त्यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये बाजी मारली. आता सुपर ट्युस्डेकडे लक्ष आहे.
‘भारत नोकऱ्या हडपतो’: रिपब्लिकन पार्टीकडून तिकिटाचे दावेदार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकींच्या हक्काच्या नोकऱ्या भारत हडपतोय, असा आरोप त्यांनी पुन्हा केला. या अगोदर दोनवेळा त्यांनी हा आरोप केला होता. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. पक्षाच्या इतर उमेदवारांच्या तुलनेत ते आघाडीवर आहेत. सुपर ट्युस्डेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी कोलंबियातील विमान तळावर आपल्या समर्थकांशी संवाद साधला. सुपर ट्युस्डे निश्चितपणे जिंकू. अमेरिकेला पुन्हा महान बनवू.