आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us President Obama Appears As Rape Suspect In Fox 5 News

फॉक्स 5 चॅनलने ओबामांना म्हटले 'रेपिस्ट', चूकीची माफी मागण्यास दिला नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन डिएगो - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 'रेपिस्ट' सांगणार्‍या 'फॉक्स 5' या वृत्तवाहिनीने माफी मागण्यास नकार दिला आहे. 'फॉक्स 5' या वृत्तवाहिनीवर शुक्रावारी रात्री 10 वाजताच्या बातम्यांमध्ये बलात्काराची एक बातमी दाखवली जात होती. यावेळी संशयीत बलात्कारीचा फोटो दाखविण्याऐवजी ओबामांचा फोटो ऑन एअर झाला. जवळपास पाच सेकंद हा फोटो दिसत होता. अशीच घटना यापूर्वी सीएनएन वाहिनीवर घडली होती. सील कमांडोकडून मारला गेलेला कुख्यात दहशतवादी ओसामाच्या ऐवजी ओबामा मारल्याचे वृत्त त्यांनी दिले होते.
टाइम्स ऑफ सन डिएगोच्या वृत्तानुसार, अँकर कॅथली बेड बातम्या देत होती. तिने सन डिएगो स्टेट यूनिव्हर्सीटी येथील बलात्कार प्रकरणातील संशयीतावर गुन्हा दाखल होणार नाही, असे म्हटले तेव्हा स्क्रिनवर संशयीताऐवजी ओबामांचा फोटो दाखविण्यात आला. असाइनमेंट एडिटर माइक व्हिलेचे म्हणणे आहे, की ते चुकीने घडले होते. आम्ही जाणूनबुजून काही केलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही.
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर 'फॉक्स 5' ने केलेल्या या चुकीवर मोठी चर्चा होत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सीएनएनच्या चुकीचा स्क्रिन शॉट