आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US Presidential Election: सुरुवातीच्या मतदानाचा विक्रम, ट्रम्प यांची हिलरींवर आघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी साधारण 10 राज्यांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. डिक्सविले नॉच, हॉर्ट्स लोकेशन आणि मिल्सफील्डस येथील मतदानानंतर डोनाल्ड ट्रम्प, हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा 32-25 ने आघाडीवर आहेत. आतापर्यंत 4 कोटी 62 लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील हे विक्रमी मतदान आहे. हिलरी आणि त्यांचे पती बिल क्लिंटन यांनी न्यूयॉर्कमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
अपडेट्स..
7:05 PM: मतदानानंतर हिलरी म्हणाल्या, 'मला विश्वास आहे की मी बेस्ट कामगिरी करु शकेल. अनेक लोक माझ्यावर विश्वास दाखवत आहेत याचा विशेष आनंद होत आहे.'
6:49 PM: हिलरी यांनी न्यूयॉर्कमध्ये मतदान केले. त्या पती बिल क्लिंटन यांच्यासोबत आल्या होत्या.
5:25 PM: अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये मतदान केंद्रांवर सकाळपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...