आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालय सोडण्याआधी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे टि्वटर अकाउंट केले सस्पेंड; कर्मचाऱ्याचा प्रताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- टि्वटरच्या एका कर्मचाऱ्याने नोकरीच्या शेवटच्या दिवशी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वटर खाते निलंबित केले. त्याच्या कृतीमुळे टि्वटर वापरकर्त्यांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. ट्रम्प यांचे अकाउंट ११ मिनिटे निलंबित होते.यादरम्यान ट्रम्प यांचे सर्च करताना हे अकाउंट अस्तित्वात नाही,असा मेसेज येत होता. यानंतर टि्वटरने त्वरित पाऊल उचलत अकाउंट सुरू केले. तासाभरात २ टि्वट करत आपल्याकडून नव्हे, तर कर्मचाऱ्याच्या चुकीने असे झाल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.  

अकाउंट सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनीही टि्वट केले की, कोण्या वाईट कर्मचाऱ्यामुळे माझे टि्वटर खाते बंद झाले होते. आता माझे शब्द पुन्हा लोकांपर्यंत पाेहोचतील. साधारणत: एखाद्या खात्यावरून सतत वादग्रस्त वा वाईट कंटेंटचे टि्वट होत राहिल्यास टि्वटर असे खाते तात्पुरते किंवा कायम निलंबित करते. डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट निलंबित झाल्याचे पाहून त्यांच्या एखाद्या आक्षेपार्ह टि्वटमुळे टि्वटरने ही कारवाई केल्याचे मानण्यात आले.  
 
डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ११ मिनिटांपर्यंत सस्पेंड...
- तासाभरात २ टि्वट करून टि्वटरने दिले स्पष्टीकरण.  
- अकाउंट सुरू झाल्यावर ट्रम्प यांनी टि्वट केले की, वाईट कर्मचाऱ्याच्या कृतीमुळे असे झाले.  
 
 
जगभरात २ तासांपेक्षा जास्त वेळ व्हॉट्सअॅप डाऊन
व्हॉट्सअॅप शुक्रवारी जगभर २ तास बंद पडले. अनेक युजर्सना मेसेज सेंड व रिसीव्ह करता आले नाही. सकाळी साधारण १२.३० ते दुपारी २.३० पर्यंत अॅप बंद होते. सोशल नेटवर्किंग साइटशी संबंधित डेटा गोळा करणारी वेबसाइट डाऊन मीटरनुसार,५१% युजर्सना कनेक्शनमध्ये, २८ टक्क्यांना मेसेज पाठवणे वा प्राप्त करण्यात व २० टक्क्यांना लॉगिनमध्ये अडचणी आल्या. 
बातम्या आणखी आहेत...