आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US रिटेल कंपनी वॉलमार्टवर भारतात कोट्यवधींचा लाच दिल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेची मल्टीनॅशनल कंपनी वॉलमार्टवर भारतात कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप लागला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार वॉलमार्टने स्थानिक अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांच्याकडून कस्टम आणि रियल इस्टेटशी संबधित परमिट मिळवले. मात्र याबाबत अद्याप वॉलमार्टकडून काहीही उत्तर आलेले नाही. वॉलमार्टचे भारतात 21 रिटेल स्टोअर आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये स्टोअर्सची ही संख्या 50 करण्याचा त्यांचा मानस आहे.

काय म्हणतात मीडिया रिपोर्टस्...
अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांच्या रिपोर्टमध्ये वॉलमार्टने भारतात त्यांच्या वस्तू कस्टमकडून सोडवण्यासाठी किंवा रियल इस्टेटचे परमिट मिळवण्यासारख्या कामांसाठी पाच डॉलर (350 रु) पासून ते 200 डॉलर (13 हजार रुपये) पर्यंत अधिकाऱ्यांना दिले. ही लाच अनेकवेळा आणि अनेकांना देण्यात आली. अशा प्रकारे वॉलमार्टने स्थानिक पातळीवर कोट्यवधींची लाच दिली आहे. 6 वर्षे एकत्र व्यवसाय केल्यानंतर वॉलमार्ट आणि भारती एंटरप्रायजेस यांच्यातील भारतातील रिटेच चेनचा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर वॉलमार्टने केवळ भारतात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी वॉलमार्टवर मेक्सिकोमध्ये ऑपरेशनदरम्यान मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

पुढे काय...
अमेरिकेत : वॉलमार्टवर अशा लाचखोरीच्या आरोपावरून दंड ठोठावला जाण्याची सक्यता कमी आहे. कारण वॉलमार्टने भारतातील व्यवसायादरम्यान अद्याप नफा कमावलेला नाही. जर वॉलमार्टवर कारवाई कारवाई झाली तर अमेरिकेच्या फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट अंतर्गत होईल. त्याअंतर्गत दंड नफ्यावर लावला जातो.
भारतात : कंपनीवर खटला होऊ शकतो पण त्यासाठी आधी तक्रार दाखल केलेली हवी त्याचबरोबर सबळ पुरावे हवे.

वॉलमार्टवर पूर्वी लागलेले आरोप
- अमेरिकेची प्रसिद्ध रिटेल कंपनी वॉलमार्ट भारताच्या बाजारात दीर्घ काळापासून लक्ष ठेवून होती. त्यासाठी चार वर्षांपासून कंपनी अमेरिकेच्या संसद सदस्यांमध्ये लॉबींग करत होती. या दरम्यान कंपनीने यासाठी 125 कोटी रुपये (250 लाख डॉलर) खर्च केले. अमेरिकेच्या सिनेटमध्ये ठेवण्यात आलेल्या वॉलमार्टच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली.
- रिपोर्टनुसार भारतात एफडीआयवर संसदेत झालेल्या चर्चेसाठीही वॉलमार्टने लॉबींग केले होते. यासाठी त्यांनी 10 कोटी, (16.50 लाख डॉलर) खर्च केले आहेत. त्यापूर्वी ते 2008 पासून भारतात गुंतवणुकीसाठी लॉबींग करत होते.
- 2012 मध्ये वॉलमार्टवर आठ रुपयांचे बेबी कॉर्न 100 रुपयांत विकल्याचा आरोप लागला. वॉलमार्टने भारती एंटरप्राइजबरोबर भागीदारीमध्ये पंजाबच्या अनेक शेकतऱ्यांना बेबीकॉर्नची शेती करण्यासाठी करार केला. बेबीकॉर्न वॉलमार्टला आठ रुपये किलो दराने खरेदी करायचे होते. पण खर्च वगळता शेतकऱ्यांना किलोमागे केवळ तीन रुपये मिळाले. तर वॉलमार्टने त्याच शेतकऱ्यांच्या शहरात ते 100 रुपये किलो दराने विक्री केले.