आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या कोणत्याही भागाला टार्गेट करता येईल अशा अण्वस्त्र निर्मितीचे भारताचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारत आपल्या अण्वस्त्रांना अत्याधिक आधुनिक करत आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यावर वचक ठेवण्यासाठी भारताचे हे प्रयत्न सुरु असल्याचे अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की भारत अशा अण्वस्त्रांचे निर्माण करत आहे ज्यामुळे चीनच्या कोणत्याही भागात क्षणात मारा करता येईल. त्यासोबतच भारताकडे 600 किलो प्लूटोनियम असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 
 
 भारत तयार करु शकतो 200 अण्वस्त्र 
 - मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील दोन तज्ज्ञांनी न्यूक्लियर फोर्सेस 2017 हा लेख लिहिला आहे. या लेखाचे लेखक हेंन्स एम ख्रश्टेंसन आणि रॉबर्ट एस नॉरिस आहे. 
 - या लेखात म्हटले आहे की भारताकडे 150-200 वॉरहेड्स तयार करण्या इतपत प्लूटोनियम उपलब्ध आहे. मात्र भारत 120 ते 130  एवढेच वॉरहेड्स तयार करेल. 
 - अमेरिकन जर्नल 'आफ्टर मिडनाइट' च्या जुलै-ऑगस्टच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की भारत अशा अण्वस्त्राची निर्मिती करत आहे जे चीनच्या कोणत्याही भागाला टार्गेट करु शकेल. 
 - भारताच्या या अण्वस्त्रसज्जतेचा उद्देश त्याचे पारंपरिक विरोधी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर वचक ठेवण्याचा असल्याचेही लेखात म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...