आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या Judge ने केला 50 महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा, फेसबूकवरही केले पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या ओहायो प्रांतातील सुप्रीम कोर्टाचे जज बिल ओ' नील यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक फेसबूक पोस्ट करून खळबळ माजली आहे. त्यांनी तब्बल 50 महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला आहे. फेसबूकवर लिहिताना त्यापैकी दोन महिलांचा त्यांनी उल्लेखही केला. यासोबतच, एका महिला सिनेटरला आपले पहिले खरे प्रेम असे म्हटले आहे. बिल सध्या गव्हर्नर पदासाठी निवडणुकीची तयारी करत आहेत. 

 

म्हणे, विरोधकांचा वेळ वाचवला...
> डेमोक्रेटिक पक्षातर्फे ते ओहायो प्रांतातील गव्हर्नर पदाच्या शर्यतीत आहेत. बिल ओ'नील यांनी सिनेटमध्ये घडलेल्या एका कथित छेडछाड प्रकरणाचा दाखला देत आपण 50 महिलांशी संबंध ठेवल्याचा दावा केला. 
> सुरुवातील काहींना त्यांचे फेसबूक अकाउंट हॅक झाल्याचे वाटले. मात्र, त्यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधून ती पोस्ट आपणच केली असे म्हटले. एवढेच नव्हे, तर 50 हा अंदाजित आकडा असून प्रत्यक्ष आकडा जास्त असू शकतो. कारण आपण कधी मोजत नव्हतो असेही ते पुढे म्हणाले.
> गव्हर्नर पदासाठी शर्यतीत असलेले प्रतिस्पर्धी आपल्या विरोधात कुप्रसिद्धीसाठी पुरावे गोळा करत आहेत. त्यामुळे, त्यांचे काम सोपे करण्यासाठी आणि त्यांच्या संशोधनाचा वेळ वाचवण्यासाठी आपण ही पोस्ट केली असे मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केले. 
> ते सध्या 70 वर्षांचे आहेत. गेल्या 50 वर्षांत आपण प्रामुख्याने महिला सिनेटर्ससह अनेक सुंदर महिलांशी शारीरिक संबंध ठेवले. त्यापैकी एक महिला सिनेटरला त्यांनी आपले खरे प्रेम म्हटले आहे. 


काय म्हणाले सरन्यायाधीश? 
ओहायो सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस मॉरीन ओ' कॉनर यांनी आपल्या सहकाऱ्याच्या फेसबूक पोस्टचा तीव्र निषेध केला. निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दही सापडत नाही, असे त्या म्हणाल्या. अशा प्रकारची वक्तव्ये जर का एखादा न्यायाधीशच करत असेल तर लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास कसा पक्का राहील? हा महिलांचा घोर अपमान आहे अशी प्रतिक्रिया मॉरीन यांनी दिली. केवळ न्यायाधीशच नव्हे, तर सामान्य नागरिक सुद्धा बिल यांना गव्हर्नर पदासाठी आतापासूनच समर्थन देणार नसल्याचे ट्विट करत आहेत. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, बिल यांच्या जशास-तशा फेसबूक पोस्ट...

बातम्या आणखी आहेत...