आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांचे दृश्य दाखवल्याप्रकरणी गुगलविरुद्धची याचिका फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - रस्त्यांचे अचूक लोकेशन व दृश्य दाखवणार्‍या गुगलच्या स्ट्रिट व्ह्यु मॅपिंग सॉफ्टवेअरने पेटंटचा भंग केल्याची वेडेरी एलएलसीने गुगलविरुद्ध दाखल केलेली याचिका अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.‘गुगलच्या स्ट्रिट व्ह्यु मॅपिंग’ नावाचे सॉफ्टवेअरद्वारे रस्त्यावरून चालणार्‍या मोटरींच्यावर कॅमेरे लावून युजर्सना रस्त्यांचे दृश्य दाखवले जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारे वाहनांचे क्रमांक आणि रस्त्यावरील प्रवाशांचे चेहरे वगळले जातात. मात्र अशा पद्धतीने छायाचित्रण करण्याच्या पद्धतीमुळे आपल्या चार पेटंटचा भंग होत असल्याचा वेडेरी एलएलसी या कंपनीने केला होता. याच आधारे वेडेरीने गुगलविरुद्ध २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने याबाबत ओबामा प्रशासनाचे म्हणणे मागवले. यात प्रशासनाने गुगलच्या बाजूने मत व्यक्त केले होते. मार्च २०१४ मध्ये एका स्थानिक न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर वेडेरीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अ‍ॅपलीनेही अशातच आपल्या युजर्सना रस्त्यांची अचूक माहिती वाहनांवर कॅमेरे लावून देण्याची सेवा सुरू केली आहे. गुगल स्ट्रिट व्ह्युसारखेच तंत्र अ‍ॅपलने अवलंबले आहे.
बातम्या आणखी आहेत...