आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील आेहियो विद्यापीठातील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ७ वर्षे कुटुंबासह वास्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो : अमेरिकेतील आेहियो विद्यापीठातील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सात वर्षे पाकिस्तानात दडून बसला होता. कुटुंबासोबत तो राहत होता. अब्दुल रज्जाक अली अर्तान (१८) अशी हल्लेखोराची आेळख सांगण्यात आली आहे.
हल्लेखाेराने विद्यापीठातील गर्दीला कारने धडक दिली होती. त्यानंतर चाकूने हल्ला करून ११ जणांना जखमी केले. प्राथमिक तपासात अब्दुल सोमालियाचा नागरिक होता, अशी माहिती मिळाली. २००७ मध्ये अब्दुलने कुटुंबासह सोमालिया सोडून पाकिस्तान गाठले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तो अमेरिकेत कायदेशीर नागरिकही बनला होता. त्याची सर्व प्रक्रिया त्याने पूर्ण केली होती. तो आेहियो विद्यापीठात लॉजिस्टिक मॅनेजमेंट विद्याशाखेचा विद्यार्थी होता. हल्ल्याच्या काही दिवस अगोदर त्याने अमेरिकेच्या विरोधात पोस्टही केली होती.
अमेरिकेने इतर देशांत नाक खुपसणे बंद केले पाहिजे. विशेषत: मुस्लिम समुदायात नको. आम्ही कमकुवत नाहीत. हे विसरू नका, असा इशारा त्याने फेसबुकच्या पोस्टवरून दिला होता. पोलिस प्रमुख किम जॅकब म्हणाले, हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असू शकतो.
बातम्या आणखी आहेत...