आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक एप्रिलपासून एच-१ बी व्हिसा स्वीकारणार, अमेरिकेच्या निर्णयाचा भारतीयांना लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आगामी आर्थिक वर्षासाठी ‘एच-१ बी’ व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास १ एप्रिलपासून प्रारंभ होईल. अमेरिकी कंपन्यांच्या वतीने कुशल परदेशी मनुष्यबळाच्या नियुक्तीसाठी या व्हिसाचा वापर केला जातो. याचा लाभ प्रामुख्याने भारतीय लोकांना होत असतो. अमेरिकेतील आर्थिक वर्ष १ऑक्टोबरपासून सुरू होते. २०१७च्या आर्थिक वर्षासाठी अमेरिकी संसदेने ६५,००० ‘एच-१ बी’ व्हिसा देण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय, अमेरिकेतील मास्टर्स किंवा त्यावरची पदवी प्राप्त केलेल्यांसाठी अतिरिक्त २०,००० ‘एच-१ बी’ व्हिसाची तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या पाच दिवसांमध्येच ६५,०००हून अधिक अर्ज दाखल होतील, असा अंदाज आहे.
अमेरिकी प्रशासनाने निश्चित केलेल्या ६५,००० या संख्येपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले तर संगणकीकृत लॉटरी पद्धतीने अर्जांचे वाटप केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...