आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या विरोधानंतर US चे भारताला मदत करण्याचे NSG सदस्यांना पुन्हा आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारताला अणु पुरवठादार समूहाचे (एनएसजी) सदस्य मिळावे यासाठी समुह देशांनी भारताला पाठिंबा द्यावे असे अमेरिकने म्हटले आहे. सेऊलमध्ये बुधवारी एनएसजी सदस्य देशांची बैठक आहे. चीनने सुरुवातीपासून एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला आहे. एवढेच नाही तर, बैठकीत भारताच्या सदस्यत्वा संदर्भात कोणताही अजेंडा नव्हता असेही चीनने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
अमेरिका करणार भारताच्या सदस्यत्वाची वकिली
- व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जॉश अर्नेस्ट यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, 'आम्हाला वाटते की भारत सदस्यत्वसाठी तयार आहे.'
- अर्नेस्ट म्हणाले, 'अमेरिकेचे एनएसजी सदस्य देशांना आवाहन आहे की त्यांनी या आठवड्यात होऊ घातलेल्या बैठकीत भारताच्या अर्जावर विचार करावा.'
- 'अमेरिका भारताच्या सदस्यत्वासाठी बैठकीत वकिली करेल.'
- दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनीही हेच सांगितले.
- या महिन्यात मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ओबामांनी भारताच्या अर्जाचे स्वागत केले होते.
व्हिएन्नाच्या बैठकीत काय झाले...
- याआधीही भारताच्या सर्वसंमत सदस्यत्वामध्ये अडथळा आणला जाऊ नये, अशी विनंती अमेरिकेने केली होती. परंतु चीनने आक्षेप घेतला. त्यामुळे या आठवड्यात सेऊलमधील अधिवेशनात त्यावर विचार होण्याची शक्यता आहे.

- व्हिएन्नात 48 सदस्यीय देशांची बैठक झाली. बहुतांश सदस्य राष्ट्रांनी भारताच्या विनंतीला मान दिला. परंतु चीनने अर्जाला विरोध दर्शवला.
चीनच्या बाजूने कोण? तुर्की, न्यूझीलंड, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रिया.

चीनकडून भारताला आशा का होती? 2008 मध्ये भारत-अमेरिका नागरी अणु कराराच्या वेळी एनएसजीच्या सदस्यत्वाचे चीनने समर्थन केले होते. त्यामुळे भारताला चीनकडून अपेक्षा होती.
भारताचा दावा : एनएसजीच्या सदस्यत्वासाठी एनपीटीवर स्वाक्षरी अनिवार्य नाही. यासंदर्भात भारताने फ्रान्सचे उदाहरण दिले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...