आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युद्ध झाल्यास उत्तर कोरिया होईल बेचिराख, सर्वच देशांनी संबंध तोडावे; अमेरिकेचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियावर आणखी कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. - Divya Marathi
उत्तर कोरियावर आणखी कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

इंटरनॅशनल डेस्क - वारंवार इशारा आणि निर्बंध धुडकावून लावणाऱ्या उत्तर कोरियाशी साऱ्या जगाने संबंध तोडावे असे आवाहन अमेरिकेने केले आहे. उत्तर कोरियासोबत आम्हाला युद्ध नको आहे. तरीही, या देशाच्या कुरापतींमुळे युद्ध पेटल्यास त्यांचा अख्खा देश बेचिराख होईल असा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हॅली यांनी दिला. उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) ची चाचणी घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली. 


> संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हॅली म्हणाल्या, अमेरिकेला संघर्ष नको आहे. तरीही उत्तर कोरियाच्या चिथावणीखोर कृत्यांमुळे युद्ध पेटल्यास उत्तर कोरिया बेचिराख होईल. 
> निकी हॅली यांनी चीन आणि रशियाला अनुसरून साऱ्या देशांना उत्तर कोरियाशी आर्थिक, औद्योगिक, तांत्रिक आणि इतर कुठल्याही प्रकारचे संबंध पूर्णपणे तोडण्याचे आवाहन केले आहे. 
> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनशी संवाद साधला. तसेच उत्तर कोरियाला चीनकडून होणारा तेल पुरवठा बंद करण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले. 

 

चीन, रशियाने अमेरिकेलाही सुनावले?
> संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाचे प्रतिनिधी वॅसिली नेबेनझ्या यांनीही उत्तर कोरियाला वेळीच सर्व प्रकारचे अणु प्रकल्प आणि मिसाइल योजना वेळीच बंद करण्यास सांगितले. यासोबतच, अमेरिकेने देखील उत्तर कोरियाचा शेजारील शत्रू राष्ट्र दक्षिण कोरियासोबत वेळोवेळीचा युद्ध सराव बंद करावा असे आवाहन केले. 
> यानंतर चीनने देखील अमेरिकेला तशाच प्रकारचा सल्ला दिला. उत्तर कोरियाला चिथावणीखोर कृत्ये आणि भाषणे बंद करण्याचे आवाहन करतानाच अमेरिकेने सुद्धा दक्षिण कोरियासोबतचे युद्ध सराव थांबवावेत असा सल्ला चीनने दिला आहे.

 

उत्तर कोरियाचा दावा काय?
हुकूमशहा किम जोंग उन आणि त्यांच्या लष्कराने बुधवारी आतापर्यंतची सर्वात शक्तीशाली इंटरकॉन्टिनेंटल मिसाइल चाचणी घेतल्याचा दावा केला. त्यांनी चाचणी घेतलेले ह्वासाँग मिसाइल 4,475 किमी पर्यंत गेले. पृथ्वीपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या अंतराची तुलना केल्यास त्यांचे मिसाइल अंतराळात त्याहून 10 पट उंच गेले होते. पृथ्वीच्या वातावरणात परतण्यासाठी त्यावर अतिरिक्त वॉरहेड देखील लावण्यात आले होते. मात्र, या दाव्यास अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रने अधिकृत दुजोरा दिला नाही. दावा मान्य नसला तरीही उत्तर कोरियाच्या टप्प्यात आता जगातील प्रत्येक देश आला आहे अशी कबुली बुधवारीच अमेरिकेने दिली.

बातम्या आणखी आहेत...