आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेतन भरघोस, पण काम नसल्याने कर्मचारी त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - न्यूयॉर्क विद्यापीठातील श्रीलंकावंशीय कर्मचाऱ्याने वारंवार विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. १९९५ पासून हरेंद्र सिरीसेना ऊर्फ हेरॉल्ड हे न्यूयॉर्क विद्यापीठात कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या लेखा परीक्षण विभागात वर्ष २००३ पर्यंत त्यांना चांगले काम होते.
मात्र, वार्षिक १ लाख अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ६८ लाख १२ हजार) इतका पगार घेऊनही त्यांना समाधान नाही. दिवसभर परिसरातल्या पक्ष्यांना व खारींना ते दाणे भरवतात व वेळ काढत असल्याची त्यांची तक्रार आहे. वर्ष २००३ मध्ये एका तरुण व्यक्तीला त्यांचे काम सोपवण्यात आले. त्यांना केवळ बिलिंगचे व इतर किरकोळ काम सांगितले जाते.

त्यांना दिलेले काम वर्षातून सरासरी ३० दिवसच असते, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. १७१ दिवस त्यांना रिकामे बसावे लागत असून जवळपास ८६ % कामाच्या तासांत त्यांना तसेच बसवून ठेवले जाते. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आहे. आपल्या शिक्षण व कौशल्यानुरूप आपल्याला काम मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. १३ वर्षांपासून भरघोस वेतन मिळूनही सिरीसेना समाधानी नाहीत.

वंशभेदी वागणुकीचा आरोप
सिरीसेना श्रीलंकावंशीय असल्याने त्यांना कामातून डावलले जाते, असा उल्लेख त्यांचे वकील ऑलिव्हर कोप्पेल यांनी याचिकेत केला. राज्याकडे उच्च शिक्षणासाठी निधीची कमतरता आहे, अशी आेरड विद्यापीठ अनेकदा करते. मात्र, सिरीसेनांच्या तक्रारीतून दुसरी बाजू समोर आल्याचे कोप्पेल म्हणतात. दरम्यान, या प्रकरणी विद्यापीठाचा एच. आर. विभाग खुलासा करेल, असे कुलगुरू जेम्स मिलिकेन यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

विद्यापीठाच्या खर्चांवर केली टीका
सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क (सीयूएनवाय) च्या अवाजवी खर्चांविषयी सिरीसेना यांनी माध्यमांना सांगितले. प्रशासनाचा कारभार शिथिल असून नको त्या ठिकाणी भरमसाट खर्च केला जातो. येथील जीवन अत्यंत विलासी असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठात असा घालवतात वेळ
संगीत एेकणे, क्रिकेट, सॉकरचे सामने पाहणे, संगणकावर गणिते साेडवणे अशा उपक्रमांत ते वेळ घालवतात. विद्यापीठाच्या शांत परिसरात बसून कंटाळा आल्यावर ते खारींना व पक्ष्यांना खाद्य टाकायला जातात. शहर तंत्रशिक्षण विभागाकडे लेखी तक्रार पाठवल्याचे सिरीसेना यांनी सांगितले. शिक्षणानुसार आपल्याला काम मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी अनेक कामे करू शकतो, मात्र ती दिली जात नाहीत, असे ते तक्रारीत म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...