आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियात थेट लष्करी कारवाई नाहीच, क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर प्रथमच ट्रम्प यांची स्पष्टोक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो) - Divya Marathi
(फाईल फोटो)
वॉशिंग्टन - सीरिया सरकारच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले तरीही अमेरिका सीरियात थेट लष्करी कारवाई करणार नाही असे स्पष्ट विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. गुरुवारी करण्यात आलेले क्षेपणास्त्र हल्ले सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांना रासायनिक हल्ल्य़ांवरून धडा शिकविण्यासाठी होते असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

सीरियामधील तणाव दूर करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीत वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यांनी काही अमेरिकन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीचे अंश समोर आले आहेत. यात डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर आपली भूमिका अजुनही बदललेली नाही असे सांगितले. सीरियावर बोलताना ते म्हणाले, की "आम्ही सीरियात मुळीच घुसणार नाही. (सीरिया सरकारच्या लष्करी तळांवर) गुरुवारी करण्यात आलेले क्षेपणास्त्र हल्ले सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांना आपल्या नागरिकांवर रासायनिक हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी होते." आपल्याच नागरिकांवर घातक सॅरीन गॅसचे हल्ले करणारे असद एक 'अतिशय क्रूर कसाई' आहेत अशी टीका देखील ट्रम्प यांनी केली. सीरियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या रासायनिक हल्ल्यात चिमुकल्यांसह जवळपास शंभर नागरिकांचा गुदमरून मृत्यू झाला. अमेरिकेने या हल्ल्यासाठी सीरिया सरकारला जबाबदार धरले आहे.
 
ओबामा प्रशासनावर टीकास्त्र
अमेरिकेने गुरुवारी सीरियाच्या सरकारी हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, खरे पाहता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनाने खूप पूर्वीच ही कारवाई करून असद यांना धडा शिकवायला हवा होता. कदाचित, सीरियातील परिस्थिती सुधारली असती 
असे ट्रम्प म्हणाले. 
 
इसिसचा नायनाट हेच प्रथम प्राधान्य
सीरियातून जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इसिसचा (आयएस) नायनाट करणे हेच अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सीरिया मोहिमेत इसिसवर मात करणे हे अमेरिकेचे प्रथम प्राधान्य असून अमेरिकेने त्यावर आपली भूमिका बदलली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा... घातक रासायनिक हल्ल्यानंतरचे चित्र...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...