Home »International »Other Country» Usa Report Says Demonetisation One Of Most Disruptive Experiments

मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वाधिक नुकसान करणारा, US रिपोर्ट

दिव्य मराठी वेब टीम | Jun 17, 2017, 10:35 AM IST

  • मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद केल्या होत्या. (संग्रहित फोटो)
वॉशिग्टन- अमेरिकेतील एका प्रसिध्द मॅगझिनने दावा केला आहे की, नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या आर्थिक इतिहासातील देशाचे सर्वाधिक नुकसान करणारा निर्णय ठरला आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्था एका प्रकारे ठप्पच झाली होती. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मोदींनी यापासून काही शिकावे

- परराष्ट्र व्यवहार या विषयावरील या मॅगझिनमध्ये लेखक जेम्स क्रेबट्री यांनी लिहिले आहे की, नोटबंदीने हे सिध्द केले की हा एक नुकसान करणारा निर्णय होता. आता मोदी प्रशासनाने आपल्या चुकांपासून काही तरी शिकले पाहिजे.
- क्रेबट्री हे सिंगापूर येथील ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीत वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत. त्यांनी भारतातील नोटबंदीवर टीका केली आहे.
- नोटबंदीबाबत सरकारने जितक्या मोठ्या प्रमाणावर काम केले त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही. हा निर्णय लोकप्रिय ठरला त्याने जीडीपीवर फारसा प्रभाव पडला नाही. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता मोदींना यापासून शिकण्यात काही अडचण येणार नाही, असे मॅगझिनने म्हटले आहे.

क्रेबट्री यांनी काय लिहिले

- नोटबंदी हा शॉर्ट टर्म ग्रोथसाठी खराब निर्णय होता. मागील आठवड्यात भारताने 2017 च्या पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जारी केले. हा तोच काळ आहे जेव्हा नोटबंदीचा सर्वात जास्त प्रभाव पडला.
- मॅगझिनच्या अहवालात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे लाखो भारतीयांना 500 आणि हजारच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले.
- नोटबंदीचा सर्वात जास्त प्रभाव हा गरिबांवरच पडला. भारताच्या रोखीवर आधारित अर्थव्यवस्थेत कमर्शियल एक्टिविटीज ठप्प झाल्या होत्या.

Next Article

Recommended