न्यूयॉर्क- भारतात एका अमेरिकन महिलेवर 2014 मध्ये उबेरच्या कॅब ड्रायव्हरने बलात्कार केला होता. आता या प्रकरणी महिलेने कंपनी आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रैविस कलानिक यांच्यावर खटला दाखला केला आहे. महिलेने त्यांच्यावर मेडिकल रिपोर्ट प्राप्त केल्याचा व तो शेअर केल्याचा आरोप केला आहे.
आशियातील बिझनेस हेडला काढले उबेरने
- महिलेने कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात याप्रकरणी खटला दाखल केला आहे. त्यात म्हटले होते की, दिल्लीत तिच्यासोबत 2014 मध्ये उबेरच्या ड्रायव्हरने बलात्कार केला होता. अमेरिकेतील उबेरचे एक्झिक्युटिव्ह आता माझा मेडिकल रिपोर्ट प्राप्त करुन तो शेअर केला आहे.
- हे प्रकरण समोर आल्यानंतर उबेरने मंगळवारी आपले आशियातील बिझनेस हेड एरिक एलेक्झांडर यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.
यांच्याविरुध्द दाखल करण्यात आला खटला
- हा खटला उबेर, ट्रैविस कलानिक, उबेरचे आशियातील बिझनेस हेड एरिक एलेक्झांडर, कंपनीचे तत्कालीन बिझनेस व्हाईस प्रेसिडेंट एमिल मायकल यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
ओलाने कट रचल्याचा आरोप
- महिलेने आरोप लावला आहे की एलेक्झांडर, कलानिक आणि मायकल यांचे म्हणणे होते की, भारतात त्याची प्रमुख स्पर्धक कंपनी असलेल्या ओलानेच आपल्या कंपनीला बदनाम करण्यासाठी हा कट रचला आहे.
- सध्या ही पीडित महिला टेक्सासमध्ये राहत आहे. तिने 2015 मध्ये उबेरवर महिला सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेत नसल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
काय आहे प्रकरण
- 5 डिसेंवर 2014 रोजी गुडगांवमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने मोबाईल अॅपद्वारे उबेरची कॅब बुक केली. तिला वसंत विहार येथून उत्तर दिल्लीत इंद्रलोक येथे जायचे होते.
- प्रवासादरम्यान या महिलेला झोप आली. ड्रायव्हर तिच्याशी छेडछाड करु लागल्यानंतर तिला जाग आली.
- महिलेने कारमधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण कारचे दरवाजे बंद होते. ड्रायव्हरने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला.
- घटनेच्या दोन दिवसानंतर 7 डिसेंबरला आरोपीला मथुरा येथून अटक करण्यात आली. कॅब ड्रायव्हर शिवकुमार यादव याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.