मेलबर्न - दक्षिण ऑस्ट्रेलियातील दोन शाळांतील विद्यार्थ्यांना आता चक्क रोबो एक सहकारी म्हणून मिळणार आहे. शैक्षणिक सुधारणेत रोबोचा परिणामकारक वापर करण्याची शक्यता पडताळली जात आहे. यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक अभ्यासक्रमात रोबोच्या वापरासाठी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच प्रयोग केला जात आहे. स्वीनबर्न युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजीने या विषयात तीन वर्षे संशोधन केले. फ्रेंच रोबोटिक्स कंपनी अल्डबरन रोबोटिक्सने एनएओ-रोबोटिक्स विकसित केले आहेत. रोबोचा शिक्षक म्हणून उपयोग करण्याच्या पद्धती विकसित करण्यासाठी शिक्षक नियमितपणे ऑनलाइन सर्वेक्षण करणार आहेत. यामध्ये ते रोबोच्या वर्गातील सहभागात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांची माहिती घेतील.
विद्यार्थ्यांमध्ये "कोडिंग' कौशल्य वाढणार
एनएओ रोबोचे वैशिष्ट्य म्हणजे ते बोलतील, नृत्य करू शकतील तसेच वर्गात फिरू शकतील, असा प्रोग्राम त्यात केला जाऊ शकतो. नव्या पिढीतील कामगारांना "कोडिंग'चे ज्ञान आवश्यक कौशल्य ठरणार आहे. शाळेतील रोबो विद्यार्थ्यांमधील कोडिंग कौशल्यात वाढ करण्यास उपयोगी ठरू शकतील, असा विश्वास केन यांनी व्यक्त केला.
पुढे वाचा... विद्यार्थ्यांना कोडिंग व प्रोग्रामिंगचा अॅक्सेस
विद्यार्थ्यांना कोडिंग व प्रोग्रामिंगचा अॅक्सेस
रोबोचा शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग होईल हे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, रोबोचा अभ्यासक्रमात चांगल्या पद्धतीने समावेश केला जाऊ शकतो हे ३ वर्षांच्या संशोधनात दिसून आले. रोबोद्वारे वर्गातील शिक्षण पद्धतीत सुधारणा केली जावी, अशी आमची अपेक्षा आहे.
राेबोच्या सहभागातून विद्यार्थ्यांना कोडिंग व प्रोग्रामिंगचा सर्वांत पहिल्यांदा अॅक्सेस मिळेल, असे केन यांनी सांगितले.
कौशल्य विकासाचे पाऊल
रोबो आपल्या समाजाचा भाग बनला आहे. त्यामुळे भविष्यातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील शाळांना तयार करणे ही आमची जबाबदारी आहे. डाॅ. थेरेस केन, मुख्य संशोधक, स्वीनबर्न