आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Users Having Technical Problem In Handling Twitter

तांत्रिक कारणामुळे ट्विटर यूझर्सना अडचणी, #TwitterDown टॉप ट्रेंडमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर मंगळवारी तांत्रिक कारणांमुळे काही तास पूर्णपणे डाऊन होते. सायंकाळी उशीरापर्यंत ट्विटरवरील अनेक फिचर्स काम करत नव्हते. वेबसाईटबरोबरच ट्विटरचे मोबाईल अॅपही क्रॅश झाले होते. त्यामुळे #TwitterDown टॉप ट्रेंडींगमध्ये आहे.

ग्राहकांना दिसतो मॅसेज..
वेबसाइटवर व्हिजिट केल्यानंतर यूझर्सना एक मॅसेज दिसत आहे. त्यात, काही तांत्रिक समस्या आहे. लक्षात आणून दिल्याबाबत धन्यवाद. लवकरच आम्ही ही समस्या दूर करू आणि पुन्हा सर्व पूर्वीप्रमाणे सुरू होईल. ('Something is technically wrong. Thanks for noticing—we're going to fix it up and have things back to normal soon.') असा उल्लेख त्यात करण्यात आला होता.

संपूर्ण प्रकरण...
- ट्विटरची वेबसाइट आणि अॅप दोन्हीही सुमारे दोन तास बंद होते.
- यादरम्यान ट्विटरचे ऑफिशियल क्लाइंट Tweetdeck ही बंद होते.
- ट्विटरच्या API स्टेटस पेज (हे केवळ डेव्हलपर्ससाठी तयार करण्यात आले आहे) वर एक मॅसेज पोस्ट करण्यात आला. त्यात काही यूझर्सना ट्विटर अॅक्सेस करण्यात अडचणी येत आहेत. आम्हाला याबाबत माहिती आहे. आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे म्हटले होते.
- एका रिपोर्टनुसार ही समस्या सर्वात आधी, इंग्लंडमध्ये लक्षात आली.
- ट्विटरचे जगभरात 30 कोटी अॅक्टीव्ह यूझर्स आहेत.

सोमवारी सायंकाळीही निर्माण झाली होती समस्या...
- सोमवारी सायंकाळी 6:23 ते 6:33 दरम्यानही यूजर्सना ट्विटर अॅक्सेस करण्यामध्ये अडचणी येत होत्या.
- वेब आणि अॅप दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही अडचण निर्माण होत होती.
- नंतर ट्विटरने यूझर्सकडे याबाबत माफी मागितली.
- गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर असे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत.
- 15 जानेवारीलाही असाच इश्यू समोर आला होता.