आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- उत्तरकोरियाने शुक्रवारी आपल्या पूर्वेकडील किनारपट्टीवरून एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, असा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. उत्तर कोरियाच्या रेडिआे लहरींमुळे आपली जीपीएस यंत्रणाही ठप्प झाल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाच्या पूर्वेकडील सोंडोकजवळ दुपारी पाऊणच्या सुमारास करण्यात आली.
क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. क्षेपणास्त्र सुमारे १०० किलोमीटर अंतरावर जाऊन कोसळले. उत्तर कोरियाने याच वर्षी जानेवारी रोजी आपली चौथी आण्विक चाचणी घेतली होती. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता.