आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजरकैदेत होती हुकुमशहाची ही ग्लॅमरस मुलगी, दोन वर्षांपासून आहे बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उझबेकिस्तानच्या राष्‍ट्रपतींची मुलगी गुलनारा करिमोवा. - Divya Marathi
उझबेकिस्तानच्या राष्‍ट्रपतींची मुलगी गुलनारा करिमोवा.
इंटरनॅशनल डेस्क - उझबेकिस्तानच्या राष्‍ट्रपतींची मुलगी गुलनारा करिमोवा मौनामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या आठवड्यात राष्‍ट्रपती इस्लाम यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतरही ती जगासमोर आली नाही. गुलनाराला इस्लाम यांची प्रबळ उत्तराधिकारी मानले जात होते. राष्‍ट्रपतींच्या तब्येतीविषयी त्यांची धाकटी मुलगी लोला करिमोवाने प्रसारमाध्‍यमांना माहिती दिली. उझबेक राष्‍ट्रपतींनी आपल्या राजकीय विरोधकांना जिवंत उकडल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. तसेच त्यांच्यावर गुलनारालाही नजरकैदेत ठेवल्याचा आरोप झाला होता. 2014 पासून अदृश्‍य आहे गुलनारा...
- गुलनाराची लहान बहीण लोलाने आपल्या वडिलांच्या तब्येतीविषयी प्रसिध्‍द पत्रक जारी केलेे असून त्यात सेरेब्रल हॅमरेजची माहिती दिली.
- लोलाने निधनाचे वृत्त फेटाळत सांगितले, की इस्लाम यांच्यावर अतिदक्षता विभागात(आयसीयू) उपचार सुरु असून त्यांची स्थिती स्थिर आहे.
- या प्रसंगी 44 वर्षांची गुलनारा जगासमोर आली नाही. यानंतर तिच्या मौनावर चर्चा सुरु झाली आहे .
- गुलनारा करिमोवाला एकेकाळी इस्लाम करिमोवाची उत्तराधिकारी मानले जात होते. मात्र ती 2014 पासून बेपत्ता आहे.
ओलिस बनवून ठेवले
- गुलनारा पेशाने पॉप गायिका, लेखिका आणि डिझाइनर आहे. 2014 मध्‍ये तिला ओलिस ठेवल्याचे माहिती समोर आली.
- गुलनाराला तिचे वडील राष्‍ट्रपती इस्‍लाम करीमोवाने आपल्याच घरात नजरकैद केले होते.
- बीबीसीला मिळाले गुप्त रेकॉर्डिंग प्रकाशित झाल्यानंतर याचा खुलासा करण्‍यात आला होता.
- लंडन येथील प्रकाशनगृहानुसार, इस्लाम करीमोवाची लो‍कप्रियतेच्या आड गुलनारा यांच्यासाठी मोठा अडथळा ठरत होती.
- गुलनाराच्या मुलाने जाहीरपणे आजोबांना आपल्या आईला सोडण्‍याची विनंती केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...