आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YOGAने लोकप्रिय केले होते उझबेक राष्‍ट्रपतींच्या मुलीला, भ्रष्‍टाचाराचे आरोपही झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उझबेकिस्तानच्या  राष्‍ट्रपतींचे मुलगी गुलनारा करिमोवाही योगाची शौकीन आहे व यामुळे ती बरीच चर्चेतही राहिली. - Divya Marathi
उझबेकिस्तानच्या राष्‍ट्रपतींचे मुलगी गुलनारा करिमोवाही योगाची शौकीन आहे व यामुळे ती बरीच चर्चेतही राहिली.
येत्या 21 जूनला आंतरराष्‍ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. भारतात नव्हे तर जगभरात योग प्रचंड लोकप्रिय झाला आहे. आशियाई देश उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींची मुलगी गुलनारा करिमोवाही योगाची शौकीन आहे. योगामुळे ती बरीच चर्चेतही होती. तीन वर्षांपूर्वी गुलनाराने आपल्या योगा सेशनचे फोटोज ट्विट केले होते. यामुळे मोठे वादंग माजले होते. योगा करताना परिधान केलेल्या कपड्यांंवर होते आक्षेप...
- गुलनाराच्या योगा सेशनच्या छायाचित्रांचा लोकांना प्रचंड राग आला होता.
- टेलिग्राफने उझबेकच्या रेडिओचा दाखला देत सांगितले, की लोकांना योगाच्या वेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांबाबत आक्षेप होता.
- यासोबत योगाच्या काही पोजबाबतही आक्षेप घेतला होता.
- लोकांनी यास मर्यादांचे उल्लंघन असे सांगितले होते.
- काही ब्लॉगर्सने तिच्या शरीरबांध्‍याची बरीच चर्चा केली होती.
- उझबेकिस्तान मुस्लिम बहुल लोकसंख्‍या असलेला देश आहे.
भ्रष्‍टाचाराचे लावले आरोप
- गुलनारा व्यवसायाने पॉप गायक, लेखक आणि डिझाइनर आहे. मात्र तिच्यावर आपल्या वडिलांच्या पदाचा फायदा घेत असल्याचा आरोप होत आहे.
- गुलनाराला मागील वर्षी 6707 कोटी रुपयांचे भ्रष्‍टाचार केल्याचाही आरोप समोर आला होता.
- तिच्यावर स्कँडीनेव्हीयन व रशियन टेलिकॉम कंपन्यांकडून मोठी रक्कम व शेअर घेतल्याचा आरोप झाला होता.
- ही रक्कम कंपन्याचे लॉबिंग करणे व तिला वैयक्तिक फायदा मिळवण्‍यासाठी घेतल्याचे बोलले गेले.
- मागील महिन्यात पनामा पेपस लिक्समध्‍येही तिचे नाव आले होते.
- अमेरिकन डिप्लोमॅट केबलने विकीलीक्स वेबसाइटवर तिला रॉबर व आपल्या देशाची सिंगल मोस्ट हेटेड पर्सन संबोधले होते.
अपहरण करण्‍यात आले
- वर्ष 2014 मध्‍ये गुलनाराचे अपहरण करण्‍यात आल्याचे सांगितले जाते.
- गुलनाराला तिचे वडील म्हणजे अध्‍यक्ष इस्लाम करीमोवाने आपल्या घरात नजरकैदत ठेवले होते.
- बीबीसीला मिळालेल्या सीक्रेट रेकॉर्डिंग प्रकाशित झाल्यानंतर याचा खुलासा झाला होता.
- लंडन येथील पब्लिकेशननुसार, इस्लाम करीमोवाची लोकप्रियतेत त्यांची मुलगी एक मोठा अडथळा बनली होती.
- गुलनाराच्या मुलाने आजोबांना आपल्या आईला सोडण्‍याची सार्वजनिक ठिकाणी विनंती केल्याने, ही प्रकरण स्पष्‍ट झाले .
पुढील स्लाइड्सवर पाहा गुलनाराचे योगा करतानाचे फोटोज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...