आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • V K Singh Alleges That Intolerance Issue Is Politically Motivated

#Intolerance : व्हीके सिंह म्हणाले, पैसे वाटून सरकारविरोधी वातावरण निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह. - Divya Marathi
फाइल फोटो - परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह.
लॉस एंजल्स - मोदी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी इनटॉलरन्सच्या (असहिष्णुता) मुद्द्यावर परखड वक्तव्य केले आहे. प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमासाठी लॉस एंजल्सला गेलेले व्हीके सिंह म्हणाले की, इनटॉलरन्सवर बिनकामाची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा वाटून सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली.
बिहार इलेक्शनमध्ये मते मिळवण्यासाठी काही राजकीय पक्षांनी निर्माण केलेला हा एक मुद्दा आहे. या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा भारतीय माध्यमांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे.

बिहार इलेक्शनमध्ये फायदा मिळावा म्हणून...
> सिंह म्हणाले की, सध्या भारतामध्ये इनटॉलरन्सचा मुद्दा गाजत आहे. पण हा मुद्दा पूर्णपणे पेड आणि पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. केवळ बिहारमध्ये फायदा मिळवण्यासाठी हा मुद्दा समोर आणण्यात आला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वीही काही राजकीय पक्षांनी इचानक ख्रिश्चन समुदाय आणि चर्चवर हल्ले सुरू केले होते. त्याचा आरोप भाजपवर लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
> सिंह म्हणाले की, यामुळे मीडियालादेखिल एक मुद्दा मिळाला. भारतीय मीडियाचे काम कसे चालते यावर मला काहीही कॉमेंट करायची नाही. प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सहभागी होणार होत्या. पण पॅरिस हल्ल्यामुळे त्या अर्ध्या रस्त्यातून म्हणजेच दुबईतूनच परतल्या. त्यांच्या ऐवजी सिंह यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

का उपस्थित झाला मुद्दा ?
कन्नड लेखक कलबुर्गी आणि गोमांस ठेवल्याच्या शंकेमुले दादरीमध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्याचा मुद्दा बनवून साहित्यिक आणि लेखक पुरस्कार परत करत आहेत. देशात इनटॉलरन्सच्या मुद्यावर काँग्रेसने सोनिया गांधींच्या नेतृत्वात मार्चही काढली होता. बिहार निवडणुकीत बीजेपी आणि मोदी सरकारच्या विरोधात हा मुद्दा उचलण्यात आला. भाजपने हा राजकीय मुद्दा असल्याचे म्हटले आहे.