आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? भारतीय दुतावासाजवळ गर्दीत घुसला ट्रक, 3 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम- स्वीडनची राजधानी स्टॉकहोम शहरात भरधाव ट्रक गर्दीत घुसल्याने 3 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ट्रक चालवणारा व्यक्ती अंदाधुंद गोळीबार करत होता, अशीही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने हा ट्रक हायजॅक केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, स्टॉकहोम शहरातील क्वीन स्ट्रीटवर भारतीय दूतावासापासून केवळ 100 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. स्वीडनचे पंतप्रधान स्टेफेन लोफवेन यांनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वीडिश पोलिसांनी सांगितले की, या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. क्वीन स्ट्रीट या भागात नेहमी वर्दळ असते. दरम्यान, भारतीय दूतावासात काम करत असलेले सर्व भारतीय आणि स्थानिक कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस दहशतवादी हल्ल्याच्या दिशेने तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...